शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी 40 हजारांची लाज घेतांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

·संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक- 03 /08/2022
शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी 40 हजारांची लाज घेतांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
सविस्तर माहिती-शेवगाव तालुक्यातील पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी 40 हजारांची लाज घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. संजय जनार्दन बडे बक्कल नंबर-1873 (वय-50) पोलिस हवालदार नेमनूक शेवगाव पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी असुन JCB च्या साहाय्याने अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्यामुळे गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच JCB जप्त न करण्यासाठी 50 हजारांची लाज मागीतली होती.तडजोडी अंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. माळी बाभुळगाव येथील तक्रारदार यांनी याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती.त्या नुसार शरद गोडेऀ पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी आज दिनांक 03/08/2022 रोजी सापळा रचून संबंधित आरोपीस ताब्यात घेतले असून आरोपी विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्येगुन्हा 764/2022 नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायदा 1988 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये देखील असाच लाच घेतांना एक पोलिस कर्मचारी ताब्यात घेण्यात आला होता. सलग झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब होत आहे. असं नागरिकांकडून बोलले जात आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब हे पारदर्शक कारभार करत असतांना त्यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी अनेक टोळ्यांना हद्दपार केले आहे. तसेच अनेक गुंडांना तडीपार केले आहे. मात्र बोटावर मोजण्या इतके पोलीस पैशाच्या लालसेपोटी लाच घेत असल्याने पोलीस दलाची प्रतिमा खराब होत आहे. सदरची कारवाई मा. सुनील कडासने साहेब पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नाशिक, मा.नारायण न्याहळदे अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि नाशिक, मा.सतिश भामरे साहेब पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.नाशिक परीक्षेञ नाशिक.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,चालक पोलिस ना.राहुल डोळसे यांनी ही कारवाई केली.