राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा राडा कुलगुरूंच्या कार्यालयावर दगडफेक करत घोषणाबाजी.
संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक-02/08/2022
राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा राडा कुलगुरूंच्या कार्यालयावर दगडफेक करत घोषणाबाजी.
सविस्तर माहिती- राहुरीच्या महात्माफुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर रविवार दि.३१ जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांच्या एका गटा कडून कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसऱ्या गटावर दगडफेक करण्यात आली असून विद्यापीठाकडून या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक झालेने एकच खळबळ उडाली असून घटनेची अधिक माहिती अशी की, कृषि पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणेसाठी या विद्यापीठात राज्यभरातून व देशातून ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते, ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना ७० हजार रुपये फी भरावी लागते, या विद्यापीठात एकूण १६८ प्रवेश मर्यादा आहे. तथापि या विद्यापीठाच्या हॉस्टेल मध्ये जवळपास ५०० विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्य करून राहात असून त्यांना कुठलीही हॉस्टेल किंवा मेस फी नाही. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली.
अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्ष्या जास्त असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हॉस्टेल पासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत ५०० विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर जोरदार दगडफेक करीत हल्ला केला, तथापि या कार्यालयाबाहेर कार्यरत सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
कुलगुरु कार्यालयात असलेल्या सुरक्षा रक्षक शेटे साहेबांच्या केबिन मध्ये या विद्यार्थ्यांनी आसरा घेतला होता. सदर परिस्थिती नियंत्रणात असुन विद्यापीठ काय भुमिका घेणार आहे याकडे लक्ष लागले आहे.विद्यापीठाचा संशोधन हा मुख्य हेतू त्यामुळे बाजूला पडला असल्याची खंतही हे विद्यार्थीनी बोलून दाखविली असल्याने या सर्व घटनेची मुख्यमंत्री महोदयांनी उच्यस्तरीय चौकशी चे आदेश द्यावेत अशी मागणी ढुस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.