45 हजारांची लाज घेतांना नेवासा पंचायत समितीचा बालविकास प्रकल्प अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

संतोष औताडे (मुख्य संपादक, नेवासा)दिनांक-01/08/2022
45 हजारांची लाज घेतांना नेवासा पंचायत समितीचा बालविकास प्रकल्प अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील रस्तापूर मधील तक्रारदार यांची चार चाकी वाहन नेवासा पंचायत समितीमध्ये भाडोत्री होती.
दरम्यान त्याचे बिल मंजूर करून चेक बँक खात्यात जमा करण्यासाठी सोपान सदाशिव ढाकणे (वय ३४ बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग २ पंचायत समिती नेवासा) यांनी २३ जून रोजी ५०,००० हजार रुपयांची मागणी केली.व तडजोडी अंती ४५,००० हजार रुपये देण्याचे ठरले.तक्रारदार यांचे चारचाकी वाहन हे भाडेतत्त्वावर बालविकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती नेवासा यांचे कडे लावण्यात आले होते.सदर वाहनाचे बील १,१४,२६१/- हे मंजूर करुन त्याचा चेक तक्रारदार यांचे बॅंक खात्यामध्ये जमा करण्यासाठी तक्रारदार यांना दिला,त्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडे रू ५०,०००/ची मागणी केली.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि.२३/०६/२०२२ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक याने पंचासमक्ष ५०,०००/रू लाचेची मागणी करुन तडजोडी अंती रू ४५,०००/- स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणून दि. ०१/०८/२०२२ रोजी आरोपी लोकसेवक यांचे विरुद्ध नेवासा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेतले आहे.