तोफखाना पोलिस स्टेशनचा पोलिस कर्मचारी व एक खाजगी एजंट 30 हजारांची लाज घेतांना लाचलुचपत विभागाच्य जाळ्यात

संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक -03/08/2022
तोफखाना पोलिस स्टेशनचा पोलिस कर्मचारी व एक खाजगी एजंट 30 हजारांची लाज घेतांना लाचलुचपत विभागाच्य जाळ्यात.
सविस्तर माहिती-अहमदनगर जिल्हा पोलीस दलात कोतवाली पोलीस स्टेशन हे अती महत्त्वाचे पोलिस स्टेशन मानले जाते. तोफखाना पोलीस ठाण्याचा ‘ एक पोलिस कर्मचारी 30 हजारांची लाज घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या पोलिसाने नेमलेल्या खासगी व्यक्तिला देखील पाईपलाईन रोडवरील सिटी स्टोअर या ठिकाणी ३० हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने पकडले. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
पोलीस नाईक शैलेश गोमसाळे आणि वैभव साळुंके (वय 35, रा. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. नगर शहरातील 35 वर्षीय तक्रारदाराला विनापरवाना दारू विक्री करण्याची परवानगी देऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आरोपी गोमसाळे यांने वैभव साळुंके यांच्यामार्फत दर महिन्याला ३० हजार रुपये हप्ता घेण्याचे मान्य केले होते. बुधवारी दुपारी आरोपी वैभव साळुंके हा एकविरा चौकातील सिटी स्टोअर या ठिकाणी लाच स्वीकारत असतांना त्याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील कारवाई
, मा.श्री. सतीश डी.भामरे, साो. वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस हवालदार सचिन गोसावी, प्रफुल माळी, चंद्रशेखर मोरे, संतोष गांगुर्डे, पोलीस नाईक शरद हेंबाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.