मोबाईल टॉवर युनिट सिस्टीम मधील डीआर यु कार्ड व फिडर केबल चोरी करणारे दोन आरोपी ७,२०,००० / – रु किं. मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
संतोष औताडे (मुख्य संपादक, नेवासा ) दिनांक : – 20/07/2022
मोबाईल टॉवर युनिट सिस्टीम मधील डीआर यु कार्ड व फिडर केबल चोरी करणारे दोन आरोपी ७,२०,००० / – रु किं. मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
·- प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की , दिनांक २३/०६/२२ रोजी फिर्यादी श्री . गोविंद , वय ४८ , धंदा खाजगी नोकरी इंडस कंपनी , रा . कोळगांव , ता . श्रीगोंदा यांचे खोसपुरी , ता . नगर शिवारातील इंडस कंपनीचे आयडीया मोबाईल टॉवर सिस्टीम युनिट मधील ६,५०० / – . किंमतीचे तीन ( ०३ ) अॅल्युमिनियम बॉडी असलेले डीआरयु कार्ड ( DRU ) अज्ञात आरोपींनी चोरुन नेले होते . सदर घटने बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४८/२२ भादविक ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा . पोलीस अधिक्षक सो , अहमदनगर यांचे आदेशाने श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी मोबाईल टॉवर डीआरयु . फिडर केबल व बॅटरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून तपासबाबत सुचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे अशा प्रकारचे गुन्हे करणा – या आरोपीची माहिती घेवून शोध घेत असतांना पोनि अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की , अहमदनगर जिल्ह्यातील मोबाईल टॉवरचे डीआरयु , फिडर केबल व बॅटरी चोरी केलेले साहित्य इसम नामे मन्मत पाटील व त्याचा साथीदार हे पांढ – या रंगाचे विनानंबर महिंद्रा टीयूव्हीमध्ये शेवगांव येथील भंगार दुकानामध्ये विक्री करण्यासाठी घेवून येणार आहे . आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / गणेश इंगळे , पोसई / सोपान गोरे , पोहेकों / भाऊसाहेब कुरुंद , पोना / विशाल दळवी , शंकर चौधरी , रवि सोनटक्के , पोकों / आकाश काळे व शिवाजी ढाकणे अशांनी मिळून शेवगांव येथे जावुन मिळालेल्या माहिती वरुन भंगार दुकानदारांकडे जावुन माहिती घेत असतांना काही इसम लांडेवस्ती येथे चोरीचा माल विक्री करणेसाठी आले बाबत माहिती प्राप्त होताच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे १ ) मन्मत जगन्नाथ पाटील , वय २ ९ , रा . वडगांव , ता . चाकुर , जिल्हा लातुर हल्ली रा . खंडोबा नगर , ता . शेवगांव व २ ) रामकिसन हरीभाऊ तांदळे , वय २७ , रा . गुंळज , ता . गेवराई , जिल्हा बीड यांना एक पांढरे रंगाचे महिंद्रा टीयुव्ही चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले . त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले . त्यांना अधिक विश्वासात घेवून कसुन चौकशी केली असता त्यांनी आम्ही क्युज आयकिया कंपनी तर्फे आयडीया टॉवर कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणुन नोकरी करतो . तसेच रामकिसन तांदळे हा माझ्या मदतीला रिगर ( मदतनीस ) आहे . नमुद गुन्हा आम्ही दोघांनी मिळुन केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेले आरोपी हे कंपनीमध्ये इंजिनिअर व रिगर ( मदतनीस ) म्हणुन नोकरीस असल्याने त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांनी नगर तालुका व पाथर्डी परिसरातील मोबाईल टॉवर सिस्टीम युनिटमध्ये अशा प्रकारचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांची अभिलेख पडताळणी केली असता खालील प्रमाणे दाखल असलेले गुन्हे उघडकिस आलेले आहेत .१ ) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८०६ / २०२ ९ भादविक ३७ ९ प्रमाणे व २ ) पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६३ / २०२२ भादविक ३७ ९ वरील प्रमाणे दोन ( ०२ ) दाखल गुन्हे उघडकिस आल्याने आरोपीस ७,२०,००० / – रु . किंचे डीआरयु फिडर केबल व टीयुव्ही महिंद्रा चारचाकी वाहनासह ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . अजीत पाटील साहेब , उविपोअ नगर ग्रामिण विभाग अहमदनर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.