इसबीएल कंपनीतील ४८००० / – रु . किं.च्या २४ बॅट-या चोरी करून विकणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक : – २१ /०७ /२०२२
इसबीएल कंपनीतील ४८००० / – रु . किं.च्या २४ बॅट-या चोरी करून विकणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
सविस्तर माहिती- , दिनांक १५/०६/२२ रोजी फिर्यादी श्री . आकाश प्रकाश गायकवाड , वय २४ वर्षे , धंदा खाजगी नोकरी , रा . कोळगाव , ता . श्रीगोंदा हे कात्रड रोड , सोनई , ता . नेवासा येथील इसबीएल कंपनीत नोकरीस असुन कर्मचारी आरोपी शिवाजी महिनीनाथ बढे , रा . लांडेवस्ती , ता शेवगांव याने नवीन २४ वॅट – या बसवुन जुन्या ४८,००० / – रु . किंच्या २४ वॅट – या वेअर हाऊसमध्ये जमा न करता चोरी करुन नेल्या आहेत . सदर घटने बाबत फिर्यादी यांनी सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. २६५ / २०२२ भादविक ३८१ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . नमुद गुन्हा दाखल झाल्या पासुन एसबीएल कंपनीचा कर्मचारी आरोपी नामे शिवाजी महिनीनाथ बढे हा फरार झाला होता . मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोनि कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / गणेश इंगळे , पोहेकॉ / विजय वेटेकर , पोना / विशाल दळवी , शंकर चौधरी , पोकों / शिवाजी ढाकणे व आकाश काळे असे पथक तयार करुन कारवाई करणे बाबत करीत सुचना व मार्गदर्शन करुन लागलीच रवाना केले . पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार फरार व पाहिजे आरोपीची माहिती घेवून शोध घेत असतांना पोनि / अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की , वर नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे शिवाजी बडे हा पांढरीपुल येथे येणार आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर प्राप्त आरोपीचे माहिती बाबत खात्री करून कारवाई करणे बाबत कळविले . पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पांढरीपुल , नगर औरंगाबाद रोड येथे वेशांतर करुन सापळा लावुन थांबलेले असतांना . थोड्याच वेळेत एक संशयीत इसम पांढरीपुल परिसरात संशयीतरित्या फिरतांना दिसुन आला पथकाची खात्री होवुन त्यास पकडण्याचे तयारीत असतांना तो पोलीस पथकाची चाहुल लागताच पळु लागला पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेवून त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव शिवाजी महिनीनाथ बढे , वय ४७ , रा . लांडेवस्ती , ता . शेवगांव असे असल्याचे सांगितले . त्याचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देव लागला . त्यास अधिक विश्वासुत घेवुन कसुन चौकशी करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन सोनई पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई सोनई पोस्टे करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . अनिल कातकाडे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .