
संतोष औताडे – मुख्य संपादक,नेवासा दिनांक– 30/08/2025
भेंडा बु ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद निर्णय कन्यादान व पुनर्विवाह योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत कन्यादान योजनेचा शुभारंभ करण्याचा ठराव. एकमताने मंजूर करण्यात आला. सरपंच सुहासिनी मिसाळ यांनी ही योजना सुरू करण्यासाठी ठराव मांडला होता. या ठरावाला एकमताने मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर पुनर्विवाह साठी भेंडा बु ग्रामपंचायत 10,000 रु मदत करणार आहे . त्याचबरोबर कन्यादान योजनेत लग्न होणा-या दाम्पत्याला भेंडा बु ग्रामपंचायतीच्या वतीने 5000 रुपये देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर सर्वप्रथम अतिक्रमण केलेल्या जागेवर
घरकुल बांधण्यासाठी
जागेवरच घरकुलाची
परवानगी मिळावी याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. भेंडा बु
ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जागेवरील
अतिक्रमण नियमाकुल करणे याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. या वेळी CHO बडेऀ मॅडम यांनी TB व बालविवाह प्रतिबंधक योजना व आरोग्य विषयक उपयुक्त माहिती दिली.
भेंडा बु च्या ग्रामसभेच्या अध्यक्ष पदी सरपंच सुहासिनीताई मिसाळ या होत्या. या ग्रामसभेसाठी
अशोक दादा मिसाळ, डॉ. लहानु मिसाळ, बाळासाहेब वाघडकर, बाळासाहेब मिसाळ,
आंबादास गोंडे, रामचंद्र गंगावणे,कादरभाई सय्यद,
दादा गजरे,
लताबाई सोनवणे, माया गंगावणे ,गणेशराव गव्हाणे
, येडुभाऊ सोनवणे, संजय मिसाळ
किशोर मिसाळ, रोहीदास आढागळे, दिलीप गोर्डे, पिंटुशेठ वाघडकर,
पत्रकार नामदेव शिंदे, पञकार रमेश पाडळे, सतिश शिंदे
तलाठी विजय काळे, ग्रामविकास अधिकारी
भिसे भाऊसाहेब ,रामकिसन देशमुख, बाबासाहेब गोर्डे, विष्णु फुलारी तसेच भेंडा बु ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते