
संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -25/06/2025
सविस्तर माहिती- अहिल्यानगर शहरामध्ये शाळकरी विद्यार्थ्याने
विद्यार्थ्याचा खून केल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील मध्यवर्ती असलेल्या सीताराम सारडा
विद्यालयातील ही घटना आहे. आठवी तील
विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
केला आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राह
आहेत. क्रिकेट खेळाच्या करणा वरून दोघांमध्ये
भांडण झालं होतं. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये
दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात
आठवी तील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या
विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला महाविद्यालयात दहावी मध्ये शिक्षण घेत
असलेल्या 14 वर्षीय विद्यार्थ्या वरती आठवीत
शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हल्ला केला. या हल्ल्यात
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला
आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ
उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या
कारवाई कडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस
ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल
झाले. सध्या पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया
सुरू आहे. मृत विद्यार्थ्यांला नगरच्या शासकीय
रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी
त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर रुग्णालयात
परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपली मुले सुरक्षित आहेत का नाही हा प्रश्न पालकांना पडला आहे.