नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यां च्या डाळिंबावर चोरांचा डल्ला 150 कॅरेट विकणारी टोळी LCB कडून जेरबंद.

संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा. दिनांक -21/08/2023
नेवासा तालुक्यातील डाळींबाच्या बागेत घुसून शेतक-यास मारहाण करून
150 कॅरेट डाळिंब चोरी करणा-या आरोपींची टोळी अ.नगर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. बाबासाहेब सुधाकर मोटे वय ५१, रा. वडाळा बहिरोबा, ता.
नेवासा यांचे व त्यांचे शेजारील शेतक-याचे शेतातील ३,४०,०००/- रुपये किंमतीचे परिपक्व १५० कॅरेट डाळींब अनोळखी
आरोपींनी शेतक-यास मारहाण करुन चोरुन नेले होते. सदर घटने बाबत शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन गु.र.नं.
१६३ / २०२३ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपासात शेतक-यास ७ ते ८
आरोपींनी मारहाण करुन डाळींबाची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने मा. पोलीस अधीक्षक सो. यांचे मार्गदर्शना प्रमाणे
सदर गुन्ह्यास भादविक ३९५ हे दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले होते.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि / श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा
अहमदनगर यांना स्थागुशाचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस
आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ / बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय
गव्हाणे, अतुल लोटके, पोना/ रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, पोकॉ/किशोर शिरसाठ, बाळासाहेब
खेडकर, मेघराज कोल्हे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चापोहेकॉ/ अर्जुन बडे व चापोकॉ/ अरुण मोरे अशा पोलीस
अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक नेवासा
परिसरात पेट्रोलिंग फिरुन आरोपींची माहिती घेताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,
वर नमुद गुन्हा हा इसम नामे साईनाथ आहिरे रा. कोरगांव, ता. नेवासा व नवनाथ गवळी रा. आंतरवली, ता. नेवासा यांनी
त्यांचे साथीदारासह केला असुन ते कोरगांव शिवार, ता. नेवासा येथे आले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी
खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/ श्री. आहिरे यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन
कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले. पथकाने नमुद ठिकाणी जावुन संशयीचे वास्तव्याबाबत माहिती घेता ते मिळुन
आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे
नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) साईनाथ बाबुराव आहिरे रा. कोरगांव, ता. नेवासा व २) नवनाथ सोमनाथ
गवळी रा. आंतरवली, ता. नेवासा असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा
गुन्हा त्यांचे इतर साथीदार नामे ३) अंक्षय दिलीप आहेर वय २२, ४) लालु बाबुराव आहिरे वय ३०, ५) वाल्मिक बबन
आहिरे वय २२ अ.क्र. ३ ते ५ रा. चितळी, ता. पाथर्डी, ६) नानासाहेब चांगदेव बर्डे वय ३०, ७) प्रल्हाद शंकर पवार
वय ४०, ८) विठ्ठल सोपान बर्डे वय ३० अ. क्र. ६ ते ८ रा. कोरगांव, ता. नेवासा, ९) आकाश पोपट माळी (फरार) व
१०) एक विधीसंघर्षीत बालक अशांनी मिळुन डांळीबाच्या बागेतुन डाळींब तोडून मालवाहु झिप टेम्पोत भरुन मार्केटला
विकुन पैसे वाटुन घेतल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवून शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम,
अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग
यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.