हस्तीदंत तस्करी करणारी टोळी, हस्तीदंत व चारचाकी वाहनासह 6 आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
संतोष औताडे ( मुख्य संपादक) दिनांक : – ०१ /०७ /२०२२
हस्तीदंत तस्करी करणारी टोळी, हस्तीदंत व चारचाकी वाहनासह 6 आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
सविस्तर माहिती- दिनांक ०१/०७/२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करत असतांना पोनि / श्री . अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोलनाका येथे दोन इसम हस्तीदंत विक्री करणे करीता येणार आहेत . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / श्री . अनिल कटके यांनी सदर माहिती मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांना कळविली होती.श्री . अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / गणेश इंगळे , पोसई / सोपान गोरे , सफौ / राजेंद्र वाघ , पोहेकों / बापुसाहेब फोलाणे , देवेंद्र शेलार , पोना / भिमराज खर्से , सुरेश माळी , शंकर चौधरी , रवि सोनटक्के , पोकॉ / सागर ससाणे व मच्छिद्र बर्डे लागलीच असे पथक तयार करून कारवाई करणे बाबत करीत सुचना व मार्गदर्शन करून रवाना केले . सदर सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने नगर औरंगाबाद रोडवरील , जेऊर टोलनाका येथे वेशांतर करुन सापळा लावुन थांबले . थोड्याच वेळेत दोन संशयीत इसम टोलनाका परिसरात संशयीतरित्या फिरतांना दिसुन आले . त्यापैकी एकाचे पाठीवर मिल्ट्री रंगाची सॅक होती . सॅकमधुन काहीतरी भाग वर आलेला व त्यास रुमाल बांधलेला होता . थोडावेळ थांबल्यानंतर संशयीत इसमा जवळ एक ग्रे रंगाची आय २० कार येवून थांबली व कार मधुन चार ( ०४ ) इसम खाली उतरले . संशयीत इसम कारमधुन आलेल्या इसमांना सॅक मधुन एक मोठा हस्तीदंत सारखी वस्तु दाखवुन बोलत असतांना करण्यासाठी आलेले इसम हेच आहेत अशी पोलीस पथकाची खात्री इसमांना झडप घालुन ताब्यात घेतले . त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात हस्तीदंत सारखी वस्तु मिळुन आली . संशयीत इसमांना त्या बाबत विचारपुस करता त्यांनी हस्तीदंत खरे असुन ते विक्री करण्यासाठी आलो अशी कबुली दिल्याने त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १ ) व्यंकटेश दुरईस्वामी , वय ४० , हल्ली रा . वाकोडी फाटा , दरेवाडी , ता . जि . अहमदनगर व २ ) महेश बाळासाहेब काटे , वय ३० , रा . आखेगांव , ता . शेवगांव असे असल्याचे सांगितले . त्यांचेकडे हस्तीदंत बाबत विचारपुस करता त्यांनी शेवगांव येथील महेश मरकड व त्याचे इतर साथीदारांना यांना काळ्या बाजारात हस्तीदंत विक्री करण्यासाठी आलो असे सांगितले . हस्तीदंत कुठून आणले आहेत या बाबत अधिक शोध घेत आहोत.ग्रे रंगाची आय -२० कारमधुन आलेल्या व ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १ ) महेश भगवान मरकड , वय २६ , रा . गहिलेवस्ती , ता . शेवगांव २ ) सचिन रमेश पन्हाळे , वय ३३ , रा . आखेगांव , ता . शेवगांव , ३ ) निशांत उमेश पन्हाळे , वय २५ , रा . भगतसिंग चौक , शेवगांव व ४ ) संकेश परशुराम नजन वय २३ , रा . पवारवस्ती शेवगांव असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी व्यंकटेश दुरईस्वाती व महेश काटे यांचेकडुन हस्तीदंत खरेदी करणेसाठी आलो असल्याचे सांगितले . उपवन संरक्षण अधिकारी अहमदनगर यांनी हस्तीदंताचे प्राथमिक तपासणीमध्ये हे दात अस्सल ( खरे ) असल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर घटने बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सदर इसमा विरुध्द भादविक ४२ ९ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १ ९ ७२ चे कलम २ ( १६ ) , ९ , ३ ९ , ४४ , ४ ९ ( ब ) , ५० व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत . पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . अजीत पाटील साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर ग्रामिण विभाग , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.