गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह दोन आरोपी राहुरी येथून जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक : – ०३ /०७ /२०२२
गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह दोन आरोपी राहुरी येथून जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
. सविस्तर माहिती- पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अ.नगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि , दोन इसम गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी राहुरी बस स्टॅण्ड परिसरात येणार आहे . आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी राहुरी परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई / सोपान गोरे , पोहेकॉ / मनोहर गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , पोना / संतोष लोढे , विजय ठोंबरे , पोकों / सागर ससाणे व रोहित येमुलं अशांनी मिळून दोन पंचासह मिळालेल्या बातमीचे ठिकाणी राहुरी बस स्टॅण्ड परिसरात सापळा लावुन थांबलेले असतांना थोड्याच वेळात दोन इसम संशयीतरित्या आजुबाजूला टेहळणी करीत पायी येतांना दिसले . पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले . दोन्ही संशयीत इसमांना पोलीस स्टाफची ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १ ) नवनाथ साहेबराव गोर्डे , वय ३४ , रा . पोहेगांव , ता . कोपरगांव व २ ) समाधान बाबासाहेब चव्हाण वय २५ , रा . कोपरगांव बेट , ता . कोपरगांव असे असल्याचे सांगीतले . त्यांना त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून त्याची अंगझडती घेतली असता नवनाथ गोर्डे याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटी कट्टा दोन जिवंत काडतूसे असे एकूण ३१,००० / – रु . कि . मुद्देमाल मिळून आला . त्यांना परवान्या बाबत विचारपुस केली असता सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यांना अधिक विश्वासात घेवून कसुन चौकशी करता त्यांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे विक्री करण्याचे उद्देशाने आलो अशी कबुली दिल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले . सदर बाबत पोकॉों / २४३१ रोहित आंबादास येमुल ने . स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं ५८ ९ / २०२२ , आर्म अॅक्ट कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील राहुरी पोलीस स्टेशन करीत आहेत . आरोपी नामे नवनाथ साहेबराव गोर्डे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस दरोडा , जबरी चोरी , आर्म अॅक्ट व अवैध दारुविक्री असे एकुण गंभीर स्वरुपाचे १२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत . सदरील कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर, स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, days संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली.