महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी करणारी गुन्हेगारांची टोळी ३,५०,००० / – रु.किच्या ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
![](https://ahmednagarpolicetimes.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220701_212908.jpg)
संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक- ०१ /०७ /२०२२
महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी करणारी गुन्हेगारांची टोळी ३,५०,००० / – रु.किच्या ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
सविस्तर माहिती- अहमदनगर जिल्हयामध्ये चैन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगांराची माहिती काढून कारवाई करून गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा . श्री मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक , श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोनि / श्री अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्याने सपोनि / दिनकर मुंडे , पोहेकॉ / विजयकुमार वेठेकर , संदीप घोडके , देवेंद्र शेलार , संदीप पवार , पोना / शंकर चौधरी , संदीप चव्हाण , रवि सोनटक्के , सचिन आडवल , संदीप दरदंले , दिपक शिंदे , पोकों / रविंद्र घुंगासे जालिंदर माने , मपोना / भाग्यश्री भिटे , मपोकॉ / ज्योती शिंदे , चापोहेकॉ / संभाजी कोतकर व अर्जुन वडे अशांनी मिळुन आरोपींचा शोध घेत असतांना पोनि / अनिल कटके , स्थागुशा , अनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , दोन इसम नामे सफीर खान व त्याचा साथीदार हे चैन स्नॅचिंग करुन चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे
. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि / श्री . अनिल कटके यांनी सदर इसमाची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने स्थागुशा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर येथे जाऊन सापळा लावुन उपाध्ये मळा , खबडी , वॉर्ड क्र . १. ता . श्रीरामपुर येथुन इसम नामे १ ) सफीर अख्तर हुसेन खान , वय २० , रा . मुंद्रा टोलनाका , इ शेंडीवालेवाबा , श्रीलंका , मुंब्रा , जिल्हा ठाणे व २ ) कैलास कमलबहादुर नेपाली वय २५ , रा . नेरळ ममदापुर , ता . कर्जत , जिल्हा रायगड हे मिळून आल्याने त्याची अंगझडती घेतली असता सफीर खान याचे कब्जात एका काळे रंगाचे कापडी पिशवीत सोन्याचे दागिने मिळुन आले त्याबाबत त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने सदर सोने हे आम्ही दोघांनी व आमचे इतर दोन साथीदारांनी मिळून अहमदनगर शहरातून महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने ओढुन चोरुन आणले असुन सदर दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले . अहमदनगर शहरातील गुन्हे अभिलेख तपासले असता वरील आरोपींनी दिलेल्या माहिती वरून खालील प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन येथे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत . सर्व गुन्हे वरील आरोपी व त्याचे साथीदाराने मिळुन केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत . ते खालील प्रमाणे १ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं . २६४/२०२२ भादविक ३ ९ २ , ३४ २ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं . ३०० / २०२२ भादविक ३ ९ २ , ३४ ३ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं . ४२० / २०२२ भादविक ३ ९ २ , ३४ ४ ) तोफखाना पो.स्टे . गुरनं . ४५३/२०२२ भादविक ३ ९ २ , ३४ गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालातील ३,५०,००० / – रुपये किंमतीचे ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचे कब्जात मिळून आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेतले . सदरची कारवाई मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामगिरी केली.