ऑपरेशन मुस्कान – २१/२०२२ दरम्यान 2383 मिसींग व्यक्तींचा शोध अहमदनगर पोलीस दलाची उल्लेखनीय कामगीरी.
- संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक- 01/07/2022
ऑपरेशन मुस्कान २१/२०२२ दरम्यान 2383 मिसींग व्यक्तींचा शोध अहमदनगर पोलीस दलाची उल्लेखनीय कामगीरी.
सविस्तर माहिती- Email htuan@mahapolice.gov.in . दिनांक : – ०१/०७/२०२२ दि .०१ / ०६ / २०२२ ते दि . ३०/०६/२०२२ दरम्यान ऑपरेशन मुस्कान संपुर्ण महाराष्ट्रभर राबवणेबाबत तसेच महिला व बालके यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते . त्या अनुशंगाने संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरविलेल्या अपनयन व अपहरण केलेल बालके यांचे शोध घेणेकामी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे . ऑपरेशन मुस्कान दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात रेकॉर्डवरील १८ ९ लहान मुलांचे अपहरणाचे गुन्हे दाखल असुन त्यापैकी एकुण ५ ९ गुन्ह्यातील ६ ९ बालके त्यापैकी ५३ मुली व ८ मुले यांचा शोध त्याचबरोबर एकुण १ ९ ७ ९ व्यक्ती हरवलेल्या होत्या . त्यापैकी ५०७ व्यक्तीचा शोध घेतलेला आहे . १०८६ महिलांपैकी २ ९ ८ महिला व ८८५ पुरुषांपैकी २० ९ पुरुष यांचा शोध घेण्यात आला आहे . तसेच पालकांसोबत गेलेले एकुण पेंडीग मुले / मुली १५४ पैकी एकुण ३४ त्यापैकी १५ मुली व १ ९ मुले यांचा शोध घेण्यात येवुन त्यांना नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे . शहर अहमदनगर जिल्ह्यात शोध घेतांना बाहेर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील पुरुष मिळुन आले· असुन त्यांना संबधित पोस्टेस वर्ग करण्यात आले आहे . तसेच रेकॉर्ड व्यतीरिक्त २० बालके त्यापैकी ९ मुली व ११ मुले मिळुन आले आहेत . व ते नातेवाईकांचे ताब्यात दिले आहेत . ऑपरेशन मुस्कान ११ दरम्यान एकुण ६२० मुले , मुली स्त्री पुरुष यांचा यशस्विरित्या शोध घेण्यात सदरची यशस्वी कामगिरी मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब . मा . श्री सौरभ कुमार अग्रवाल साहेब अपर श्रीमती स्वाती भोर मँडम अपर पोलीस अधिक्षक व मा . कमलाकर जाधव पोलीस उप अधिक्षक , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी पोलीस निरिक्षक भिमराव नंदूरकर व पोसई भैय्यासाहेब देशमुख , मपोहेकाँ / १२४६ अर्चना काळे , मपोहेकॉ / १०८२ अनिता पवार , मपोकाँ / १३६५ छाया रांधवन मपोकाँ / १७४२ रुपाली लोहाळे चापोकॉ / २६७३ एस.एस. काळे यांनी केली आहे .