गुन्हेगारी
Trending

श्रीगोंदा येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे ( मुख्य संपादक)    दिनांक : – 29/06/2022


श्रीगोंदा येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.


सविस्तर माहिती- श्री . राजाराम चंदर ढवळे , वय ४४ वर्ष . रा . राजापूर शिवार , ता . श्रीगोंदा यांची राजापूर शिवारातील घोडनदी पात्रालगत शेत जमीन असून सदर जमीनी मधील चिंचणी धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर फिर्यादी हे सदर जमीनीमध्ये जनावरा करीता चारा पिकवून काही क्षेत्रामधील मातीची विक्री करतात . दरम्याण दि . २८/५/२१ रोजी व त्यापुर्वी आरोपी नामे संतोष राधू शिंदे , रा . राजापूर , ता . श्रीगोंदा याने व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादी यांना वेळोवेळी दमदाटी करुन , रिव्हॉल्वरचा धाक दाखून फिर्यादी यांचे शेत जमीनीमधून जेसीबी व पोकलँडचे सहायाने माती बळजबरीने घेवून गेले होते . सदर बाबत फिर्यादी यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा . २२७ / २०२१ भादविक ३ ९ ५ सह आर्म अॅक्ट ३/२५ , ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी विरुध्द मोक्कान्वय ३ ( १ ) ( II ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते . मोक्का व दरोडा गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत मा . पोलीस अधिक्षक सो . यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थागुशा अ.नगर यांना स्वतंत्र पथक नेमुन फरार आरोपींचा शोध घेवून अटक करणे बाबत सुचना दिल्या होत्या . नमुद सुचना प्रमाणे स्थागुशाचे पथक श्रीगोंदा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि / अनिल कटके , स्थागुशा अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , आरोपी नामे राजेंद्र ढवळे हा राजापुर , श्रीगोंदा येथे त्याचे राहते आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / अनिल कटके यांनी मिळालेली माहिती तात्काळ स्थागुशा पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे , सफी / भाऊसाहेब काळे , पोहेकॉ / मनोहर गोसावी , देवेंद्र शेलार , पोना / शंकर चौधरी , रवि सोनटक्के , पोकों / सागर ससाणे , रोहित येमुल रविंद्र घुंगासे , मच्छिद्र बडे , रणजीत जाधव , आकाश काळे , मयुर गायकवाड व चापोहेकों / उमाकांत गावडे यांना कळवून बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठिकाणा बाबत माहिती घेवून आरोपीस ताब्यात घेणे बाबत कळविले . त्या प्रमाणे पथकाने आरोपीचे घराचे आजु बाजूस सापळा लावुन आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले . त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने , त्याचे नाव राजेंद्र बबन ढवळे वय ३२ , रा . राजापुर , ता . श्रीगोंदा असे सांगितले . त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील कायदेशिर कारवाई करीता बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई बेलवंडी पोस्टे करीत आहे . आरोपी नामे राजेंद्र बबन ढवळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोक्का , खुनाचा प्रयत्न , दरोडा , वाळु चोरी व दुखापत करणे असे गंभीर स्वरूपाचे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे . गु.र.नं. व कलम अ.क्र . पोलीस स्टेशन शिरुर , जिल्हा पुणे १ ९ ३ / २०१७ भादविक ३२३ , ३२४ , १४३ , ५०४,५०६ १६० / २०१ ९ भादविक ३७ ९ .३४ पर्या.का.क . ३/१५ बेलवंडी बेलवंडी १६५ / २०१ ९ भादविक ३०७ बेलवंडी २२७/२०२१ भादविक ३ ९ ५ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ , ४/२५ व म.सं.गु.का. क . ( मोक्का ) ३ ( १ ) ( II ) , ३ ( २ ) . ३ ( ४ ) सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधिक्षक , अहमदनगर व श्री . आण्णासाहेब जाधव साहेब , उपविभागीय पोलीस विभाग , अहमदनगर , यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अधिकारी , कर्जत केलेली आहे

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे