गुन्हेगारी
Trending

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणारा आरोपी श्रीरामपुर येथुन जेरबंद.

संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक-28 /06/2022


गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणारा आरोपी श्रीरामपुर येथुन जेरबंद.


सविस्तर माहिती-दिनांक 27/06/ 2022 रोजी 15.35 वा पोलीस निरीक्षक श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , इसम नामे प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा . खैरी निमगाव ता . श्रीरामपुर हा गावटी कटटा बाळगतो . तसेच तो खैरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई समर्थ मंगल कार्यालयाजवळ आहे अशी माहिती मिळाली तेव्हा श्री . मच्छिद्र खाडे , पोलीस निरीक्षक श्री . अतुल बोरसे , पोसई , पोना / 1251 शेंगाळे , पोकॉ / 173 सुनिल दिघे व चापोकॉ . चंदभाई पठाण अशानी दि . 27.06.2022 रोजी 15.50 वा निमगाव खैरी ता श्रीरामपुर येथील शिवारातील खैरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई समर्थ मंगल कार्यालया जवळ एक इसम आम्हाला उभा दिसला व तो आम्हा पोलीसांना पाहून लागला त्यावेळी त्याचेवर झडप घालुन पकडले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा . खैरी निमगाव ता . श्रीरामपुर असे सांगितले आहे . त्याची अंगझडती घेतली असता तेव्हा त्याचेकडे एक गावठी कटटा सुमारे 20,000 / – रु किंमतीचा व 2 जिवंत काडतुस 1000 / – रु किंमतीचे असा मुद्देमाल मिळुन आला आहे सदरचा मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे . सदर घटनेवरुन प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा . खैरी निमगाव ता . श्रीरामपुर यांचे विरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजि . नंबर 210/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3 / 25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई . अतुल बोरसे हे करत आहेत . . सदर आरोपी प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळें रा . खैरी निमगाव ता . श्रीरामपुर यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . नमुद दाखल गुन्हयामध्ये मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक अहमदनगर , मा . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि मा . श्री . संदिप मिटके साहेब , उपविभागिय पोलीस अधिकारी , श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे श्री मच्छिंद्र खाडे , पोलीस निरीक्षक , पोसई , अतुल बोरसे , पोना / 1251 अनिल शेंगाळे , पोकॉ / 173 सुनिल दिघे चापोकॉ , चंदभाई पठाण यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे