अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर कर्जत पोलीस ठाण्याचे विभाजन होवुन मिरजगांव व जामखेड पोलीस ठाण्याचे विभाजन होवुन खर्डा दोन नवीन पोलीस ठाणे
![](https://ahmednagarpolicetimes.com/wp-content/uploads/2022/06/IMG_20220629_210525.jpg)
संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक-29/06/2022
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर कर्जत पोलीस ठाण्याचे विभाजन होवुन मिरजगांव व जामखेड पोलीस ठाण्याचे विभाजन होवुन खर्डा दोन नवीन पोलीस ठाणे.
सविस्तर माहिती- अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाचे दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे . अहमदनगर जिल्ह्याचे सरहद्दीवर पुणे , ठाणे , नाशिक , बीड , सोलापुर व उस्मानाबाद असे सहा जिल्हे येतात त्यामुळे गुन्हेगारांना जिल्हा बदलून गुन्हे करण्यास वाव मिळतो . त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दाखल होणारे शरीरा विरुध्द व मालाविरुध्दचे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याचे दृष्टीने मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी जिल्ह्यात दाखल होणारे गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यांचा विशेषतः कर्जत व जामखेड तालुक्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेवून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच नमुद तालुक्यातील जनतेला कामकाज करणे सोपे व्हावे व जनतेस तात्काळ पोलीस मदत उपलब्ध व्हावी या करीता शासनस्तरावर प्रस्ताव सादर करुन वेळोवेळी प्रस्तावाचा पाठपुरावा करुन अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे अस्थापनेवर कर्जत पोलीस ठाण्याचे • विभाजन करुन मिरजगांव व जामखेड पोलीस ठाण्याचे विभाजन करुन खर्डा अशी दोन नवीन पोलीस ठाणे दि . ३०/०६/२०२२ रोजी पासुन कार्यान्वीत करण्यात येत आहेत . नव्याने कार्यान्वीत मिरजगांव व खर्डा पोलीस ठाण्यास आवश्यकते नुसार पोलीस अधिकारी , अंमलदार , वाहने CCTNS कार्यप्रणाली , संगणक व इतर कार्यालयीन साधन सामग्री उपब्लध करून दिलेली आहे . मिरजगांव पोलीस ठाणे हे बनकर वस्ती जवळ , कर्जत रोड , मिरजगांव , ता . जिल्हा अहमदनगर येथे व खर्डा पोलीस ठाणे हे खर्डा बसस्टॅण्ड जवळ , खर्डा , ता . जामखेड , जिल्हा अहमदनगर
येथे कार्यान्वीत करण्यात आले असुन नमुद पोलीस ठाणे अंतर्गत समाविष्ट गांवातील जनतेने संबंधीत पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी अवाहन केले आहे.