पंडित सराफ आयोजित सुवर्ण खरेदी लकी ड्रॉ व खेळ सुवर्ण अलंकारांचा बक्षिस वितरण सोहळा अभिनेत्री भुमिजा पाटील यांच्या हस्ते संपन्न.
संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक- 27/06/2022
भेंडा येथील पंडित सराफ आयोजित सुवर्ण लकी ड्रॉ व खेळ सुवर्ण अलंकारांचा बक्षिस वितरण सोहळा अभिनेत्री भुमिजा पाटील यांच्या हस्ते संपन्न.
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील सुप्रसिध्द पंडित सराफ यांच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त 3 मे 2022 ते 25जुन 2022 या कालावधीत आकर्षक खरेदीवर विविध प्रकारचे बक्षिसे ठेवण्यात आली होती. या सोडतीचा बक्षिस वितरण सोहळा 26 जुन रोजी दुपारी 4 वा सिनेअभिनेत्री भुमिजा पाटील यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता. या बक्षिस वितरण प्रसंगी खेळ सुवर्ण अलंकारांचा हा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. या खेळाचे सादरीकरण रवि पंडित, दिनकर पंडित यांनी केले होते. खेळात विजयी महिलांना खास बक्षिसे पंडित सराफ यांच्या वतीने देण्यात आली होती. त्यामध्ये खेळ सुवर्ण अलंकाराचा विजेते 1-सौ जोगेश्वरी पांडुळे, 2-सौ प्रतिक्षा कटारनवरे, 3-सौ.संजिवनी मुरकुटे यांना देण्यात आली. तसेच 3 मे 2022 ते 25 जुन 2022 पर्यंत या कालावधीत 5000 रूपयांच्या रोख खरेेेेदीवर 1कुुुपण अशी स्कीम देण्यात आली होती बक्षिसामधे .प्रथम क्रमांकासाठी रेखा सर्जेराव साळवे यांना 5 ग्रॅम सोन्याची पिळा अंगठी, दुस-या क्रमांकासाठी अशोक बाबासाहेब सुसे यांना 3ग्रॅम सोन्याची पिळा अंगठी, तिसऱ्या क्रमांकासाठी अनिता सचिन काळे यांना1ग्रॅम सोन्याची पिळा अंगठी अशी तीन बक्षिसे भुमिजा पाटीलयांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आली होती. पंडित सराफ यांच्या वतीने एकुण 101 बक्षिसाचे वितरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ.उषाताई लहानु मिसाळ, सौ.वौशालीताई शिंदे, सौ.छायाताई काळे,सौ.सुमनताई काळे,सौ.सुनंदा पंडित,सौ.अर्चना पंडित.आनंदा साळवे, डॉ. कविता मुळे ,अर्चना मिसाळ, शिवनंदाताई , जेबा मॅडम, राजेंद्र जावळे इ.उपस्थित होते. या बक्षिस वितरण सोहळ्यासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन गणेश महाराज चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सागर पंडित यांनी मांडले.