श्रीगोंदा येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक : -१२ /०६/२०२२ २०२२
श्रीगोंदा येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रस्तुत बातमी- फिर्यादी श्री . राजाराम चंदर ढवळे , वय ४४ वर्षे , रा . राजापूर शिवार , ता . श्रीगोंदा यांची राजापूर शिवारातील घोडनदी पात्रालगत शेत जमिन असून सदर जमिनीमधील चिंचणी धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर फिर्यादी हे सदर जमिनीमध्ये जनावरा करीता चारा पिकवून काही क्षेत्रामधील मातीची विक्री करतात . दरम्याण दि . २८/५/२१ रोजी व त्यापुर्वी आरोपी नामे संतोष राधू शिंदे , रा . राजापूर , ता . श्रीगोंदा याने व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादी यांना वेळोवेळी दमदाटी करुन , रिव्हॉल्वरचा धाक दाखून फियांदी यांचे शेत जमिनीमधून जेसीबी व पोकलँडचे सहायाने माती बळजबरीने घेवून गेले होते . सदर बाबत फिर्यादी यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं . २२७ / २०२ ९ भादविक ३ ९ ५ सह आर्म अॅक्ट ३/२५ , ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी विरुध्द मोक्कान्वय ३ ( १ ) ( II ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते . मोक्का व दरोडा गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत मा . पोलीस अधिक्षक सो . यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थागुशा अ.नगर यांना स्वतंत्र पथक नेमण फरार आरोपींचा शोध घेवून अटक करणे बाबत सुचना दिल्या होत्या . नमुद सुचना प्रमाणे स्थागुशाचे पथक श्रीगोंदा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि / अनिल कटके , स्थागुशा अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , आरोपी नामे चंद्रकांत घावटे , रा . शेळकेवाडी , राजापुर , ता . श्रीगोंदा हा त्याचे वडीलांचे वर्षश्राध्दाचे कार्यक्रमासाठी राहते घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / अनिल कटके यांनी मिळालेली माहिती तात्काळ स्थागुशा पथकातील सपोनि / गणेश इंगळे , पोहेकॉ / बबन मखरे , सुनिल चव्हाण , दत्ता हिंगडे , पोना / विशाल दळवी , शंकर चौधरी , पोकों / आकाश काळे व चापोहेकॉ / चंद्रकांत कुसळकर यांना कळवून बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठिकाणा बाबत माहिती घेवून आरोपीस ताब्यात घेणे बाबत कळविले . त्या प्रमाणे पथकाने आरोपीचे घराचे आजू बाजूस सापळा लावुन आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले . त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने , त्याचे नाव चंदु ऊर्फ चंद्रकात भाऊसाहेब घावटे , वय २ ९ , रा . शेळकेवाडी , राजापुर , ता . श्रीगोंदा असे सांगितले . त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील कायदेशिर कारवाई करीता बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.