राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती जेेरबंद. आरोपी नेवासा तालुक्यातील भेंडा येथील.

संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक- 31/05/2022
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती जेेरबंद. आरोपी नेवासा तालुक्यातील भेंडा येथील.
·राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती हा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील असून त्याला नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील ( ता . नगर येथून ताब्यात घेतले आहे.धमकिचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळताच अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली . आज सकाळी सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने चिंचोडी पाटील गावातून आरोपीला ताब्यात घेतले आहे . अटकेची कारवाई सुरू असून दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे . रुपाली चाकणकर यांना या अगोदरही दोन वेळा धमकीचे फोन आलेले होते . तुमचा कार्यक्रम करु , ठार मारू अशा प्रकारची भाषा त्या धमकीच्या फोनमध्ये वापरली गेली होती. सोमवारी दुपारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात रूपाली चाकणकर यांना धमकीचा फोन आला होता . पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु , असा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. सॅटेलाईटद्वारे माझ्या मेंदूचा आणि बायकोच्या मेंदूचा ताबा घेतल्याने आपण महिला आयोगाकडे तक्रार केली होती मात्र आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही म्हणून आपण हा प्रकार केला आहे . आता मी न्यायालयात हा सॅटेलाईट प्रकार पुराव्यानिशी सांगणार आहे ‘ असेही आरोपींने सांगितले. तो . त्याचा हा कांगावा आणि दावा ऐकून पोलिसही चकित झाले मात्र प्रकरणाचा सविस्तर तपास.करण्यात येेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले सदर आरोपींला पुणे क्राईमब्रॅच यांच्या ताब्यात देण्यात आले असून.पुढील तपास पोलिस करीत आहेत.