अहमदनगर पोलीस दलातर्फे सेवानिवृत्त पोलिसांचा निरोप समारंभ उत्साहात..पोलिस सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात- मनोज पाटील पोलिस अधीक्षक

संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक- 04/05/2022
अहमदनगर पोलीस दलातर्फे सेवानिवृत्त पोलिसांचा निरोप समारंभ उत्साहात..पोलिस सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात- मनोज पाटील पोलिस अधीक्षक
अहमदनगर पोलीस दलात नोकरी करत असताना सेवानिवृत्ती कधी होते हे कळतच नाही.तसेच सणवार,उत्सव हे देखील कधी आले गेले हे कळत नाही.पोलीस ही सेवा आहे.देशसेवेचे घेतलेले अखंड व्रत आहे.पोलीस समाजामध्ये काम करीत असताना सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करीत असतो. अन्यायग्रस्त विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या सर्वसामान्य माणसाची मदत पोलीस करत असतात.तसेच समाज सुरक्षित करण्यात सेवानिवृत्त पोलिसांचा महत्त्वाचा हातभार आहे.त्यामुळेच असंख्य नागरिकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील.सेवा निवृत्ती नंतर नवीन आयुष्याला सुरूवात होत आहे बरेच राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी व स्वतःसाठी जगण्याची संधी आहे. पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचे काम सेवानिवृत्त पोलिसांनी करावे.असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. पोलिस हेडक्वार्टर येथील पोलिस लाॅन येथे सेवानिवृत्त पोलिस व अधिकारी यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला याप्रसंगी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ आग्रवाल,पोलीस उपअधिक्षक नाईक पाटील व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हातील ४४ सेवानिवृत्त पोलिसांचा सपत्निक व कुंटुंबासमवेत सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.सहाय्यक फौजदार राजेंद्र सावंत यांनी २९५ पदके व पोलिस महासंचालक पदक मिळविल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास पोलिस व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संखेनी उपस्तीथ होते.अहमदनगर पोलीस दलातर्फे सेवानिवृत्त पोलीसांचा सपत्नीक सत्कार अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.