ब्रेकिंग
Trending

मंदिरात चोरी करणारे आरोपी 24 तासांच्या आत जेरबंद नेवासा पोलिसांची कामगिरी.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा.                दिनांक -02/08/2025

सविस्तर माहिती-
रांजणगाव देवीचे ता. नेवासा येथील दिनांक 28 जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाचे 22400 रुपये किमतीचे 28 पितळी टाळ चोरीला गेल्याचे समजून आल्यानंतर याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे अशोक बाबासाहेब चौधरी वय 60 वर्ष रा. रांजणगाव देवी ताल. नेवासा यांनी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीला अनुसरून पोलीस ठाणे नेवासा येथे आज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करून तपास पोलीस नाईक बाबा वाघमोडे यांच्याकडे देण्यात आला होता.
चोरीचा गुन्हा नोंद केल्यानंतर धनंजय अ. जाधव, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नेवासा यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली होती. या कामी पोलीस ठाणे नेवासाकडील डी.बी. पथक कामास जुंपले होते. तपासा दरम्यान पोलिसांनी मंदिराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक ऑटोरिक्षा संशयास्पद फिरताना दिसून आली होती. पोलिसांनी हाच धागा पकडून सीसीटीव्ही फुटेज तपासत संशयास्पद रिक्षाचा माग काढीत शेवगाव पर्यंत गेले होते. शेवगावमध्ये गेल्यानंतर सदरची रिक्षा राजू भगवान नागरे रा. दादेगाव रोड, शेवगाव यांच्या मालकीची असून राजू नागरे व संगीता सूर्यकांत सर्जेराव रा. कापकर वस्ती, शेवगाव या दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केल्यानंतर प्रथमतः आम्ही असे काही केलेच नाही असे पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवून पुन्हा बारकाईने विचारपूस केली असता रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर मंदिरातून पितळी टाळ चोरल्याचे कबूल केले. या चोरी प्रकरणी 1.राजू भगवान नागरे व 2.संगीता सूर्यकांत सर्जेराव यांना अटक करून 22400/- रुपये किमतीचे 28 पितळी टाळ व ऑटो रिक्षा पोलिसांनी जप्त केले आहेत. चोरीस गेले टाळ पोलिसांनी परत मिळवल्यानंतर भजनी मंडळाने आनंद व्यक्त केला आहे. अटकत असलेल्या या दोघांनी आणखी कोठे मंदिरात चोरी केली आहे का या बाबतचा सखोल तपास देखील करण्यात येणार आहे.
सदरचा तपास पोलिस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, गणेश जाधव व अमोल साळवे यांनी केला.

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे