अहमदनगर जिल्ह्यातील १२३ ठिकाणी अवैध दारु व गावठी हातभट्टी मधील १२३ आरोपी विरुध्द कारवाई करुन ७,१८,०२८ / – रु . कि . चा मुद्देमाल जप्त करुन नाश स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संतोष औताडे (मुख्य संपादक, नेवासा) दिनांक- 06/08/2022
अहमदनगर जिल्ह्यातील १२३ ठिकाणी अवैध दारु व गावठी हातभट्टी मधील १२३ आरोपी विरुध्द कारवाई करुन ७,१८,०२८ / – रु . कि . चा मुद्देमाल जप्त करुन नाश स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
. सविस्तर माहिती- मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना दिनांक १५/०७/२०२२ ते दिनांक ३१/०७/२०२२ या कालावधीत अवैध दारु विरुध्द विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोनि / श्री . अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वर नमुद कालावधीत जास्तीत जास्त अवैध दारु विरुध्द कारवाई करणे बाबत सुचना दिल्या . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / सोमनाथ दिवटे , सपोनि / गणेश इंगळे , सपोनि दिनकर मुंडे , पोसई / सोपान गोरे व अंमलदार अशांनी मिळुन अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारु , गावठी हातभट्टयांचा शोध घेवुन १२३ ठिकाणांवर छापे घालुन एकुण ७ , ९ ८,०२८ / – रु.किं . चा मुद्देमाल जप्त करुन नाश केला आहे . तसेच १२३ केसेसमध्ये १२३ आरोपी विरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे . सदर कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अगरवाल साहेब , अपर पोलीस अधिक्षक , अहमदनगर व श्रीमती . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.