ब्रेकिंग
Trending

शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व ११२ पोलिस निवासस्थाने यांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न.

संतोष औताडे /मुख्य संपादक.                  दि. 06 एप्रिल 2022


शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व ११२ पोलिस निवासस्थाने यांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न.


सविस्तर माहिती- शिर्डी येथील उपविभागीय पोलिस कार्यालयाचे उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. ( दि . ६ एप्रिल ) रोजी आयोजित उद्घाटनप्रसंगी प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे  यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सर्व वास्तूंचे उद्घाटन झाले . यावेळी आधुनिक शस्त्रास्त्रे , संपर्क यंत्रणा , सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई – ऑफिसचे काम करण्यात येत आहे . याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसांनी करू नये . असे ही उपमुख्यमंत्री श्री . अजितदादा पवार यानी सांगितले .पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री . अजितदादा पवार म्हणाले , गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस दलासोबत पोलिसातील इतर विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते . जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील . या उद्घाटनप्रसंगी यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ , जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख , नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे , आ . आशुतोष काळे , खा . सुजय विखे पा . , खा . सदाशिव लोखंडे , आ . किशोर दराडे , मुंबई आ.डॉ.सुधीर तांबे आ . संग्राम जगताप आणि पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर, महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेञाचे विशेष पोलिस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी शेखर, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर, स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, सौरभकुमार अग्रवाल, तसेच पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे