ब्रेकिंग
Trending

अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगरची कारवाई.

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक- 14/12/2022


. मा . श्री . राकेश ओला साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थागुशा अहमदनगर यांना जिल्यातुन हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन जास्तीत जास्त हद्दपार आरोपी विरुध्द कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथक हद्दपार आरोपींचा शोध घेत असताना पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , आरोपी नामे दिनेश तुळशीराम वाघमारे , रा . हरीमळा , सोलापुर रोड , अहमदनगर हा हद्दपार असताना लपुनछपून त्याचे घरी राहतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या . नमुद सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सफो / मनोहर शेजवळ , भाऊसाहेब काळे , पोहेकॉ / विजयकुमार वेठेकर , संदीप घोडके , देवेंद्र शेलार , विश्वास बेरड , पोना / शंकर चौधरी , लक्ष्मण खोकले , रवि सोनटक्के व पोकॉ / रणजीत जाधव अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने आरोपीचे राहते घरी हरीमळा , सोलापुर रोड , अहमदनगर येथे जावुन घराचे आजु बाजुला सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम दिसला पोलीस पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगितली व त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव पप्पु ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे , रा . हरीमळा , सोलापुर रोड , अहमदनगर असे असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या हद्दपार आरोपी नामे दिनेश वाघमारे याने मा . उपविभागीय दंडाधिकारी , नगर विभाग यांचेकडील हद्दपार प्रस्ताव क्रमांक ०५/२०२१ , दि . १७/०१/२०२२ अन्वये दोन ( ०२ ) वर्षे कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे . हद्दपार आरोपीने हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या अहमदनगर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पोना / १७७२ लक्ष्मण चिंधु खोकले ने . स्थागुशा अहमदनगर याचे फिर्यादी वरुन भिंगार कॅम्प पोस्टे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . राकेश ओला साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . प्रशांत खैरे साहेब , अपर पोलीस अधिक्षक , अहमदनगर व श्री . अनिल कातकाडे साहेब , उविपोअ नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे