गुन्हेगारी
Trending

तोफखाना पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्थेचा अभिनव उपक्रम बेवारस वाहने मुळ मालकांना केली परत.

संतोष औताडे / मुख्य संपादक                   दिनांक-31मार्च 2022


तोफखाना पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्थेचा अभिनव उपक्रम बेवारस वाहने मुळ मालकांना केली परत.


सविस्तर माहिती- तोफखाना पोलीस स्टेशन कडील वर्षानुवर्ष पडुन असलेले वाहने मुळ मालकाचा शोध घेवुन देत आहेत. तोफखाना पोलीस स्टेशन परीसरात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीसांनी जप्त करून आणले आहेत तसेच काही वाहने बेवारस मिळुन आल्याने तेही पोलीस स्टेशनला आणून जप्त केले आहेत . सदरील वाहन मालकाचा पोलीस स्टेशन स्तरावर तसेच गंगामाता वाहन संस्था यांच्या मार्फतीने शोध घेत असताना सदरील वाहन मालकाचे पत्यावर पत्र व्यवहार केला असता बरेच पत्र गाडी मालक त्यांच्या पत्यावर मिळुन न आल्याने सदरील वाहने ताब्यात देण्यासाठी आडचणी निर्माण होत आहेत . हि बाब लक्षात घेवून तोफखाना पोलीस स्टेशनने गंगामाता वाहन शोध संस्था , पुणे यांच्या सहाय्याने वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला . आपले वाहन ओळख पटवुन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन वाहन लवकरात लवकर घेवून जावेत . मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो अहमदनगर यांच्या आदेशान्वये मा . अपर पोलीस अधिक्षक श्री सौरव कुमार अग्रवाल सो . मा . उप विभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कातकडे सो यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशन आवारात मालकाच्या प्रतिक्षेत अनेक वर्षापासून बेवारस , अपघात व विविध गुन्ह्यात जप्त असलेल्या काही वाहनाच्या मालकांचा शोध घेण्यास पोलीस निरीक्षक श्री ज्योती गडकरी सो ,, सपोनी जुबेर मुजावर सो , सपोनी नितीन रणदिवे , सपोनी भान्सी सो पोसई समाधान सोळंके मुद्देमाल कारकून सफौ / राठोड व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत , उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे भारत वाघ , देवीदास उदावंत , गोरख नवसुपे , संजय काळे यांना यश आले आहे . सदरील वाहनांची ओळख पटवून व पुरावे देऊन परत घेऊन जाणे बाबत आव्हान पोलीसांनी केले आहे . तोफखाना पोलीस स्टेशन , आवारात ४०० हून अधिक गाड्या पडून आहेत . सदर वाहने वर्षानुवर्ष पडुन असल्यामुळे त्याचे इंजिन व इतर साहित्याचे नुकसान होत आहेत त्यापैकी काही वाहन मालकाचा शोध लागला असुन बाकी वाहन मालकांचा शोध लावण्याचा तपास चालू आहे .. तरी वाहन मालकाने वाहनांचे नोंदणी क्रमांक , वाहनाचा प्रकार , चेसी नं , इंजीन नं , वाहन मालकाचे नाव ..पत्ता यांची यादी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेली आहे . तसेच सोबत वाहानांची यादी सादर केली आहे . सदर यादी मध्ये आपले वाहन नाव असल्यास अशा मालकांनी ओळख पटवून आपले वाहने घेऊन जावीत . सदीरल वाहने आपण ओळख पटवुन घेवुन न गेल्यास ते वाहने बेवारस समजुन सरकारी प्रक्रीया पुर्ण करुन लिलाव करण्यात येणार आहेत असे पोलीस निरीक्षक श्री ज्योती गडकरी पोलिस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर यांनी सांगीतले आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे