धान्याची ट्रक चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

संतोष औताडे / मुख्य संपादक दिनांक -26 मार्च 2022
धान्याची ट्रक चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
* सविस्तर माहिती- धान्याची ट्रक चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे. विकास अनाजी शेळके (वय ४२,रा. शिरुर जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि.२६ मार्च २०२२ रोजी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २२ मार्च २०२२ रोजी सुवर्णज्योत हॉटेल समोरुन अहमदनगर पुणे रोड येथून १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मका धान्य भरलेले ट्रक तीन जणांनी धाक दाखवून जबरीचोरी करुन पळवून नेल्याबाबत योगेश वाकडे (रा. शेवगांव ता.शेवगांव जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १८२/२०२२ भां.द.वि. कलम.३९२,३४ प्रमाणे दि. २४ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता.
दि.२५ मार्च २०२२ रोजी आरोपी विकास अनाजी शेळके याला नगर तालुका पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मका धांन्य भरलेले ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीच्या इतर दोन साथीदारांचा तपास सुरु आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप, पोउपनि रणजीत मारग, सफौ दिनकर घोरपडे, पोकॉ विशाल टकले, पोकॉ संदीप जाधव, पोकॉ विक्रांत भालसिंग, पोहेकॉ गणेश लबडे, पोना रवि सोनटक्के आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.