
संतोष औताडे /मुख्य संपादक दि. 26 मार्च 2022
एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त , श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी.
सविस्तर माहिती- दिनांक २५/०३/२०२२ रोजी रोजी १७/३५ वा.चे सुमारास पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की , एक संशयीत इसम हा आपले कब्जात विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगून रेल्वे स्टेशन समोर वार्ड नं . ५ श्रीरामपूर येथे फिरत आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी तपास पथकाचे स.पो.नि.जिवन चोरसे , पोकॉ / ६१५ राहुल नरवडे पोकॉ / रमिजराजा आत्तार , यांना बातमीतील माहिती सांगून कारवाई करणे कामी रवाना केले . तपास पथक हे रेल्वे स्टेशन जवळ गेले असता , नमूद बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम रेल्वे स्टेशन समोर फिरत असलेला दिसून आला . तपास पथकाला पाहून सदर संशयित इसम पळून जाऊ लागला त्याचा पाठलाग करुन त्यास पकडून त्याचे नांव गाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नांव सचिन बाळू धुमाळ वय ३० वर्षे रा.संभाजी चौक , अशोकनगर ता . श्रीरामपूर असे सांगितले त्यानंतर त्याचे अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावटी कट्टा व एक जिवंत काडतुस असे एकूण २५,५०० / – एकुण किंमतीचे मुद्देमालासह मिळून आला आहे . त्यानंतर पोकॉ / ५६१ राहुल नहादेव नरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर गु.र.नं. २२० / २०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ / अतुल लोटके हे करित आहेत . सदरची कारवाई मा . श्री मनोज पाटील पोलीस अधीक्षक सो . अहमदनगर , श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री संदीप मिटके सो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय सानप , सपोनि जिवन बोरसे , पोना / पंकज गोसावी , पोकॉ / राहुल नरवडे , पोकॉ / रमिज आत्तार , पवार यांनी केली आहे .