संतोष औताडे राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्काराने सन्मानित. रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

संतोष औताडे / मुख्य संपादक. दि. 23/03/2022
संतोष औताडे राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्काराने सन्मानित. रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
सविस्तर माहिती- रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि.20 मार्च 2022 रोजी बीड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे अभिनेते राजेश खडेऀ, सिनेअभिनेत्री अपेक्षा निर्मळ, अभिनेत्री मनाली शीरूरकर, अभिनेत्री प्रीती हौसरमल, प्रा. डॉ. दीपाताई क्षीरसागर मा. नगराध्यक्षा , मराठी चित्रपट महामंडल अध्यक्ष प्रशांत होर्शिळ यांची प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळा पार पडला. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील प्रसिद्ध काविळ उपचार तज्ञ सुनिल आण्णसाहेब वाबळे यांना देखील आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक,राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच ,उद्योग भूषण, पत्रकार , युवारत्न, समाजभूषण, आदर्श तलाठी, आदर्श ग्रामसेवक, आदर्श शिक्षक प्रसारण सेवा सामाजिक ,शैक्षणिक, कोरोना योद्धा, मीडिया कृषी, व्यापार ,कला, राजकीय महसूल वैद्यकीय, आध्यात्मिक, ऐतिहासिक दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. , क्रिडा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. 2021/22 वर्षीचा रयत सामाजिक प्रतिष्ठान चा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.विविध क्षेञातील कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने केले जाते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, मानाचा फेटा असे होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चित्रपट दिग्दर्शक राजकुमार दाभाडे अध्यक्ष मराठी चित्रपट महामडल प्रशांत होर्शिळ कोलिगित अभिनेता राजेश खर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती
तर चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री व कलावंताची उपस्थितीत होती या अँकर पूजा चांडक. अभिनेत्री प्रिती हौसलमल . अभिनेत्री मनाली शिरूरकर . अभिनेत्री अपेक्षा निर्मळ . राजेश दाभाडे. अभिनेते तथा उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष रविराज जाधव. राहुल हौसलमल महाराष्ट्र चित्रपट मंडळ . संगीता धसे, रोहिनीताई माने (अध्यक्ष रयत सामाजिक प्रतिष्ठान), गणेश माने तसेच परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी सुमधुर गींताचाही काार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.