चैन स्नॅचिंग गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे ( मुख्य संपादक नेवासा) दिनांक-14 /09/2022
चैन स्नॅचिंग गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
दिनांक : -१४ / ० ९ / २०२२ प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की , फिर्यादी श्रीमती . कृष्णवेणी गंगारत्नम पालती , वय ४७ , रा . विनायक नगर , निजामाबाद , तेलंगणा या दिनांक १५/०५/२२ रोजी शिर्डी येथे शॉपींग करीता रस्त्याने पायी जात असतांना अनोळखी दोन इसम मोटार सायकलवर रौंग साईडने फिर्यादीचे समोरुन येवुन मोटार सायकलवर पाटीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील ६६,००० / – रु किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन तोडुन चोरुन नेले . सदर घटने बाबत शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. २१ ९ / २०२२ भादविक ३ ९ ४ , ३४ प्रमाणे चैन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याचे तपासात एक आरोपी निष्पन्न करुन त्यास गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मंगळसुत्रासह अटक करण्यात आली होती . परंतु एक आरोपी घटना घडले पासुन फरार झाला होता . मा . श्री . मनोज पाटील साहेब पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोनि / श्री . अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई / सोपान गोरे , पोहेकॉ / विजय वेटेकर , पोहेकॉ / बापुसाहेब फोलाणे , संदीप घोडके , पोना / शंकर चौधरी , रवि सोनटक्के , विशाल दळवी , भिमराज खर्से , आकाश काळे व चापोहेकॉ / संभाजी कोतकर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे करीता सुचना व मार्गदर्शन करुन पंथक रवाना केले . पथक श्रीरामपूर शहर व परिसरात फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि / अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , वर नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे ऋषी जाधव हा सुतगिरणी , ता . श्रीरामपूर येथे त्याचे राहते घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / कटके यांनी मिळालेल्या माहितीची पडताळणी करणे करीता पथक सुतगिरणी , श्रीरामपूर येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम पायी येताना दिसला . त्यास पथकाने शिताफीने ताब्यात घेवून त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने , त्याचे नाव ऋषी कैलास जाधव वय २१ , रा . शक्तीनगर , सुतगिरणी , ता . श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले . त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल व बारकाईने तपास केला असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील कायदेशिर कार्यवाही करीता शिर्डी पोस्टे येथे हजर केले असुन पुढील कारवाई शिर्डी पोस्टे करीत आहे . आरोपी नामे ऋषी कैलास जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात चैन स्नॅचिंगचे एकुण आहेत ते खालील प्रमाणे सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.