
संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -04/04/2025
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील श्री अवधूत अशोकराव लोहकरे आदर्श युवा समाजभुषण पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. अखिल सोनार समाज प्रतिष्ठान , आंबेजोगाई, बीड यांच्या वतीने घेण्यात येणारा मानाचा ” सन्मान सुवर्णरत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक 28 मार्च 2025 रोजी श्री.क्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
भेंडा येथे विविध सामाजिक, शैक्षणिक , धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे लोहकरे परिवारचे नाव आदराने घेतले जाते.
आपल्या कार्याने सामाजिक संघटन करून, सामाजिक जाणिव जोपासणाऱ्या व पुढील पिढीस प्रेरणादायी असणाऱ्या विविध क्षेत्रातील सुवर्णरत्नांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रेरणादायी युवा नेतृत्व असणाऱ्या भेंडा बु येथील प्रतिष्ठित व्यापारी, बालाजी ज्वेलर्सचे अवधूत लोहकरे यांना या वर्षाचा ” आदर्श युवा समाजभूषण पुरस्कार” 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.
‘वसुधैव कुटुंबकम’ उक्तीप्रमाणे आपापसातील मतभेत गट तट विसरून सर्वांनी एकाच छताखाली येऊन कार्य करावं फक्त समाज बघत न बसता सर्वांनाच सोबत घेऊन कार्य केल्यास निश्चित प्रगती साधता येईल असं आव्हान अवधूत लोहकरे यांनी यावेळी सांगितले. आपल्या समाजात सेवेच्या माध्यमातून समाजातील सर्व सोनार समाजाच्या हितासाठी काम करून.नवी दिशा देण्याचे काम करणार असल्याचे अवधूत लोहकरे यांनी सांगितले. यावेळी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन अवधूत लोहकरे यांना सन्मानित करण्यात आले. या शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रतिष्ठान चे संस्थापक मा.राजेशभाऊ पंडित रेणापूरकर यांनी पंढरपूर येथील आनंदी विनायक मंगल कार्यालय येथे केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंद्याचे सुप्रसिद्ध सराफ अनिलसेठ धर्माधिकारी, तर प्रमुख उपस्थिती श्री.संत नरहरी महाराज मंदिराचे विश्वस्त – सुभाष दादा वेदपाठक, श्रीनिवास बानकर, अशोकराव लोहकरे, शिवानंदजी टाकसाळे होते तसेच महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.