ब्रेकिंग
Trending

अवैधरित्या वाळुवाहतूक करणारा ढंपर पकडला नेवासा पोलिसांची कारवाई

संतोष औताडे-मुख संपादक, नेवासा.                    दिनांक – 01/04/2025

सविस्तर माहिती- दिनांक ३१.०३.२०२५ रोजी दुपारी ०७.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील देवगाव गावाचे शिवारामध्ये एका संपरमधुन वाळू वाहतुक होणार आहे अशी खात्रीलायक बातमी
मिळाल्याने तात्काळ पोसई शैलेंद्र ससाणे, पोना/ ९७३ बी. बी. काळोखे, पोना / १३८० बाबासाहेब वाघमोडे, पोको १०२ वाल्मिक वाघ,
पोकों/२७५ संदीप ढाकणे, पोकी / १६९७ गणेश फाटक अशा पोलीसांचे पोलीस पथक तयार करुन त्यांना सदर ठिकाणी पंचासह
जावून छापा टाकून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन व सुचना देवून शिताफीने छापेमारी करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशीत
केले होते. त्यानुसार सदर पथकाने पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमधील मिळालेल्या माहिती नुसार कुकाणा ते देवगाव ता.नेवासा
जि. अहिल्यानगर अशा जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून सदरच्या वाहनाचा मागोवा घेतला असता सदरचे वाहन देवगावकडुन एक
वाळूने भरलेला डंपर येताना दिसल्याने त्यास पोसई शैलेंद्र ससाणे यांनी सदर डंपरला हात दाखवून थांबण्याचा ईशारा केला
असता, सदर डंपरच्या चालकाने त्याचा डंपर न थांबवता पुढे घेवून गेला त्यादरम्याण सदर पोलीस पथकाने त्यांच्याकडील वाहनाने
डंपरचा पाठलाग करुन काही अंतरावर डंपर पकडून त्यास थांबवले असता, त्यावरील डंपर चालकास त्याचे नाव गाव विचारले
असता, त्याने त्याचे नाव सोमनाथ लक्ष्मण पवार, वय ३६ वर्षे, रा.खडका ता. नेवासा जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले
त्यास वाळू कोन आणली याबाबत विचारणा केली असता त्याने सदरची बाळू ही गोदावरी नदीच्या पात्रातून आणली असलेबाबत
सांगुन त्याबाबत त्याच्याकडे कसलाच परवाना नसल्याचे सांगून सदर आरोपी हा पासिंग क्रमांक MH १६०९६९ या
क्रमांकाच्या डंपरमध्ये अंदाजे ०३ ब्रास वाळुची चोरटी वाहतुक करीत असताना एकुण १५,४५,०००/- रुपयांच्या मुद्देमालासह
मिळून आल्याने त्याच्याविरुध्द पोकों/ वाल्मिक जालींदर वाघ यांनी फिर्याद देवून गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास
पोना/बी.बी. काळोखे हे करीत आहेत.
तरी यापुढे पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध वाळू चोरी, अवैध रित्या वाळुची चोरटी वाहतूक
करणारे, अवैध धंदे चालकांवर छापेमारी करून कठोर कारवाई करण्यात येणार असून ज्या व्यक्तींवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल
आहेत त्यांच्याविरुध्द हडपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई
चालु राहणार आहे असे ठणकावून सांगितले.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्रीम. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक
श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील शेवगाव उपविभाग यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस
स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे व धंनजय अ. जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नेवासा यांनी
व त्यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोना/बी. बी. काळोखे, पोना/बाबासाहेब वाघमोडे, पोको वाल्मिक
वाघ, पोकों/संदीप ढाकणे, पोको/गणेश फाटक यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे