परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ खाडे यांचे पथकाने ४८ तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील आरोपीस ठोकल्या बेड्या.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -01/04/2025
सविस्तर माहिती-
दिनांक २८.०३.२०२५ रोजी ११.०० ते दिनांक २९.०३.२०२५ रोजी चे पहाटे ०६.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुरज
राज पठारे, वय २८ वर्षे, व्यवसाय शिक्षक रा. पावन गणपती यांची त्यांचे राहते घरासमोर बजाज कंपनीची ५०,००० /- रुपये
किंमतीची पल्सर मोटार सायकल तसेच श्री पार्वती ऑईल ॲण्ड प्रोडक्ट या दुकानाचे पाठीमागील बाजुचे दरवाजा कोंडा वाकवून
आत प्रवेश करुन दुकानातील १०,०००/- रुपये किंमतीचे तेलाच्या बॉटल, २,०००/- रुपये किंमतीच्या गुळाच्या ढेपी,, १५००/-
रुपये किंमतीचे तुप, ३०००/- रुपये रोख असा एकुण ६६,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरी / घरफोडी
करुन चोरी करुन नेला म्हणुन वगैरे मजकुराच्या फिर्याद वरुन गु.र.नं ३१२ / २०२५ भा.दं.वि कलम ३०३ (२), ३३१ (४), ३०५
प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वर नमुद गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच सदर आरोपीं चा शोध घेणे कामी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष
आ. खाडे यांनी पोलीस स्टेशन नेवास्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोहेकॉ / अजय साठे, पोकॉ/सुमित करंजकर,
पोकॉ/नारायण डमाळे, पोकॉ/ अप्पासाहेब तांबे, पोकॉ/ श्रीनाथ गवळी, पोकॉ / अरविंद वैद्य अशांचे पथक तयार करुन सदर अज्ञात
चोरट्यांचा शोध घेणेबाबत कळविले असता, सदर पोलीस पथकाने त्यांचे गोपनीय खबऱ्यांकडुन माहिती प्राप्त केली की, सदरचा
मुद्देमाल हा कृष्णा नारायण भोसले रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह चोरुन नेलेला आहे अशी
खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर तो सध्या कोठे आहे याबाबत माहिती घेतली असता, सदर आरोपी हा नेवासा फाटा मुकींदपुर
शिवारातील गाढव नाला येथील पारधी वस्तीवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर सदर पथकाने मिळालेल्या
माहितीनुसार गाढव नाला येथील पारधी वस्तीवर जावुन सापळा लावला परंतु कृष्णा नारायण भोसले याने पोलीसांना पाहताच
पळुन जात असताना पथकातील पोलीस अंमलदार नारायण डमाळे यांनी सदर आरोपीचा पाठलाग करुन त्याचे अंगावर झडप
टाकुन त्यास पकडले त्यानंतर सदर आरोपीस पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यास गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता, त्याने
कबुल केलेला आहे तसेच त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन पुढील तपास पोहेकॉ / अजय साठे हे करीत आहेत.
त्याने गुन्हा
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्रीम. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक
श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील शेवगाव उपविभाग यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस
स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे व धंनजय अ. जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नेवासा यांनी
व त्यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोकॉ / अजय साठे, पोकॉ/सुमित करंजकर, पोकॉ/ नारायण
डमाळे, पोकॉ/ अप्पासाहेब तांबे, पोकॉ/ श्रीनाथ गवळी, पोकॉ/ अरविंद वैद्य यांनी केलेली आहे.