ब्रेकिंग
Trending

चांदणी चौक येथे वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतुक शाखेची विशेष कारवाई.

संतोष औताडे -मुख्य‌‌‌ संपादक नेवासा           दिनांक -02/03/2026

सविस्तर माहिती –चांदणी चौक येथे वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतुक शाखेची विशेष कारवाई.
दि. ०२/०३/२०२६ रोजी चांदणी चौक येथे आचानक नाकाबंदी करुन नाकाबंदी दरम्यान वाहतुक
नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द मोटार वाहन कायद्या प्रमाणे वाहनास काळी काच ०३, लायसन्स सोबत
न बाळगणे २०, लायसन्स नसणे ०७, ट्रिपल शिट वहन चालवणे १९, वाहनास नंबर प्लेट नसणे / फॅन्सी नंबर
प्लेट बसवणे ५९, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलने ०१, अवैध प्रवाशी वाहतुक केसेस ०२ इतर ७०
आशा एकुण १८१ ई चलान कारवाई करण्यात आलेल्या असुन २२३५०/- रु रोख दंड वसुल करण्यात
आलेला असुन अनपेड एकुण दंड १५०६५० /- करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस
अधीक्षक, अहिल्यानगर, डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीसधिकरी, अहिल्यानगर शहर विभाग यांचे
आदेशान्वये शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि / बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिनस्त
पोलीस अधिकारी / अंमलदार पोसई शमुवेल गायकवाड, पोउनि मन्सुर सय्यद, पोउनि असिफ शेख, सफौ.
रामराव शिरसाट, सफौ. संजय घोरपडे, पोहवा. खेडकर पोशि. खंडागळे, पोशि.सतिश दळवी, पोशि. मधुकर
ससे, पोशि. उंडे, पोशि. गडदे वॉर्डन, अरविंद चौटिले, निखिल कारखेले संदिप शेंडगे, गैरव पाटोळे, रोडे
यांचेकडुन कारवाई करण्यात आलेली आहे.
तरी सर्व नागरीकांना अव्हाण करण्यात येते की, अल्पवयीन मुलांस वाहन चालवण्यास देवु नये तसेच
आपल्या वाहनांच्या काळ्या काचा करणे, वाहनांना नोंदणी क्रमाक न लावणे किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावने,
फटाका सायलेन्सरचा वापर करणे या सारख्या वाहतुक नियमांचे भग न करता वाहतुक नियमांचे पलन नियमित
पणे करण्यात यावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे