
संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा दिनांक-02/08/2025
श्रीरामपूर पोलीस विभागात राबविण्यात आले ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले आहे. आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, हे सण उत्सव सण उत्सव शांततेत पार पडावे,त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काल रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशन च्या हद्दीत मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये व मा. श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली व
मा. श्री. सुनिल पाटील, उ.वि.पो.अधीकारी शेवगाव, मा. श्री. बसवराज शिवपूजे, उप.वि.पो.अधीकारी श्रीरामपूर, मा. श्री. शिरीष वमने, उप.वि.पो.अधीकारी, शिर्डी व श्री. कुणाल सोनवणे, उप.वि.पो.अधीकारी, संगमनेर उपविभाग यांचे देखरेखीखाली
श्रीरामपूर विभागात दि. 01/08/2025 ते रोजीचे दुपारी 2.00 वा. ते दि. 02/08/2025 रोजीचे रात्री 01.00 वा.चे दरम्यान कोंबींग/ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले आहे.
त्यामध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
1) एकूण 431 समन्सची बजावणी करण्यात आलेली आहे.
2) एकूण 131 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे.
3) एकूण 107 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. ह्या व्यक्तींना विविध न्यायालयांनी अटक वॉरंट जारी केले होते. त्यांना अटक करून आज रोजी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
4) दारूबंदी कायदा खाली संपूर्ण हद्दीमध्ये विविध ठिकाणी रेड करण्यात आल्या. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे 28 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले व दा अवैध दारू जप्त करण्यात आली. तसेच दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दहा व्यक्तींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम कलम 85(1) प्रमाणे 10 गुन्हे दाखल करण्यात आले.
5) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा खाली विविध ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर रेड करण्यात आल्या. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) नुसार 13 केसेस करण्यात आलेल्या आहेत.
6) आर आऊट ऑपरेशन दरम्यान रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद रित्या फिरणाऱ्या पाच व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे 5 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळी या ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान संशयास्पद मालमत्ता ताब्यात मिळून आलेल्या पाच व्यक्तीदेखील मिळून आल्या त्या पाचही व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस कलम 124 प्रमाणे 5 केसेस करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडे संशयित मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत.
7) दारू पिऊन वाहन चालविणारे 11 इसमांवर drunk and drive च्या कारवाई करण्यात आलेली आहे.
8) विविध पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा करून फरार असणाऱ्या आरोपींची देखील all out ऑपरेशन दरम्यान शोध मोहीम राबविण्यात आली. त्यापैकी 3 आरोप मिळून आल्याने अटक करण्यात आलेली आहे.
9) अवैधरित्या हत्यार बाळगणारे आरोपींवर कारवाई करून हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
10) मोटार वाहन कायद्यान्वये एकूण 80 केसेस करून 65900/- रू. दंड वसूल करण्या आलेला आहे.
11) श्रीरामपूर विभागातील सर्व तडीपार आरोपींना चेक करण्यात आले. त्यापैकी नेवासा पो.स्टे. हद्दीत 1 आरोपी मिळून आल्याने त्याचेविरूद्ध म.पो.का.क. 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
12) संगमनेर तालुका पोस्टे. हद्दीतील शिक्षा पात्र वॉरंट स्पेशल केस नं. 18/2009 मधील आरोपी आनंदा किसन चौधरी वय – 42 वर्षे रा. शिरसगाव धुपे ता. संगमनेर यांस
मा. सत्र न्यायालयाने 3 वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
सदरच्या all out ऑपरेशन मध्ये सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन चा स्टाफ सहभागी झाला होता..