
संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा, दिनांक -08/08/2025
सविस्तर माहिती- जिल्हा
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे
यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस
दलात मोठे फेरबदल करण्यात
आले आहेत. 7 ऑगस्ट 2025 रोजी
सहा पोलीस निरीक्षकांच्या
जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात
आल्या आहेत. याबाबतचे आदेश
जारी करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक
कार्यालयाने 5 ऑगस्ट 2025 रोजी
घेतलेल्या आस्थापना मंडळाच्या
बैठकीत बदल्या संदर्भात निर्णय
घेतला होता. हा निर्णय महाराष्ट्र
पोलीस अधिनियम 1951 मधील
कलम 22 चे पोटकलम (2) नुसार
व पोलीस अस्थापणा मंडळास
मिळालेल्या अधिकारा नुसार घेण्यात
आला आहे. त्यानुसार श्री महेश विष्णू पाटील यांची नेवासा पोलिस स्टेशन येथे नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून जाते
जगभरात मुंबई पोलिस दलाचा
नावलौकिक आहे. याच पोलिस
दलात मागील 13 वर्षे पोलिस
निरीक्षक महेश पाटील यांनी काम
केले आहे. या काळात त्यांनी
मुंबईतील विविध पोलिस स्टेशनला
कामकाज केले. अतिशय निडरपणे
त्यांनी आपली सेवा बजावली. या
काळात त्यांनी अनेक खतरनाक
गुन्हेगारांचा बंदोबस्त केला.

आपले विद्यमान पद सोडून तात्काळ
नव्या पदस्थापनेवर हजर राहावे.
तसेच, नवीन ठिकाणी रुजू
झाल्याची माहिती नियंत्रण कक्ष,
पोलीस अधीक्षक कार्यालय, येथे
लेखी स्वरूपात सादर करावी. असेही बदली
आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत.