महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने नवतेजस्विनी महोत्सवाचे आयोजन

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा. दिनांक-15/03/2025
महिला व बालविकास विभाग महिला
आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने नवतेजस्विनी महोत्सवाचे आयोजन सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील नागेबाबा भक्त निवास येथे महिला व बालविकास व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय भव्य नवतेजस्विनी जञा २०२५ चे आयोजन 18 ते 20 मार्च 2025 या कालावधीत सकाळी 9 ते 10 सायंकाळी वाजेपर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे.

ज्ञानेश्वरी लोकसंचलीत साधन केंद्र,नेवासा
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत
माविम बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तुचे भव्य प्रदर्शन
तालुकास्तरीय भव्य नवतेजस्विनी महोत्सव २०२५ या मधे विविध प्रकारच्या भव्य रांगोळी स्पर्धा,बुक प्रदर्शन, वकृत्व स्पर्धा, यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या ठिकाणी ग्रामिण व शहरी भागातील बचत गटातील महिला बँक कर्ज व अंतर्गत कर्ज घेऊन व विविध योजनेचा लाभ घेऊन उद्योग व्यवसाय करीत आहे. या महिलांच्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या करिता नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बचत गटातील महिलांचे १०० पेक्षा जास्त स्टॉल याठिकाणी लावण्यात येणार असुन आपण या तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २०२५ ला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा व महिलांचे मनोबल वाढवावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २०२५ मधे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये
नाचणीचे बिस्कीट, विविध प्रकारचे जाम, विविध प्रकारचे मसाले, सर्व प्रकारचे पापड, कर्जतची प्रसिद्ध शिपी आमटी, गावरान तूप, कापडी पिशव्या, बाजरीची भाकर,मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत, शेंगदाणे, कराळे, तीळ, खोबरे चटण्या, मांडे, पाणीपुरी, भेळपुरी, आप्पे, सोयाबीन चिल्ली, विविध प्रकारचे लोणचे, बर्फाचा गोळा, लेडीज ज्वेलरी, वडापाव, भाजे, उन्हाळी पदार्थ, अस्सल चहा पावडर, आयुर्वेदीक हळद, कपडे, चपला, बांगड्या, कडधान्य,खेळणी यांसह परदेशात गाजलेले माठातले लोणचे, सतरंजी, सोलर उत्पादने यांसारख्या विविध वस्तू खरेदी करण्याची सुवर्ण संधी
या कार्यक्रमाचे स्वरूप
१८ तारखेला उद्घाटन समारंभ , भव्य रांगोळी स्पर्धा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री व्यवसायातून विविध प्रकारच्या वस्तू ची विक्री व प्रदर्शन केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी
१९ तारखेला वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सायंकाळी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
20 तारखेला सकाळी रक्तदान शिबीर, कवीसंमेलन, उखाणे स्पर्धा व सायंकाळी खास महिलांसाठी क्रांतीनाना माळेगावकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 ते 20 या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवाचे बक्षीस वितरण समारंभ शेवटच्या दिवशी संपन्न होणार आहे. प्रत्येक स्पर्धामधे आपले कुवतीनुसार बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी नवतेजस्विनी महोत्सवामधे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महिला व बालविकास व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.