सौ. ज्योती संतोष औताडे (चौधरी ) राज्यस्तरीय आदर्श महिला पञकार पुरस्काराने सन्मानित

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक- 10/03/2025
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील सौ. ज्योती संतोष औताडे (चौधरी ) राज्यस्तरीय आदर्श महिला पञकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2025 दिनांक 09 मार्च 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बीड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे सिने अभिनेते तथा कोळी गितकार राजेशदादा खडेऀ, सिनेअभिनेत्री संध्या मस्के , बीड येथील रीलस्टार यांची प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळा पार पडला.

पञकारीता शेञात अतिशय धडाडीचे व निर्भीडपणे पञकारीता करणारी महिला पञकार म्हणून सौ.ज्योती संतोष औताडे (चौधरी) यांची ओळख आहे.. श्रीरामपूर शहरात पञकारीता करत असतांना त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनॅशनल प्रेस असोसिएशन श्रीरामपूर महिला तालुका अध्यक्ष म्हणून त्या पञकारीता शेञात मागील काही वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात सामाजिक,राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच ,उद्योग भूषण, पत्रकार , युवारत्न, समाजभूषण, आदर्श तलाठी, आदर्श ग्रामसेवक, आदर्श शिक्षक प्रसारण सेवा सामाजिक ,शैक्षणिक, क्रीडा ,कृषी, व्यापार ,कला, वैद्यकीय, सरपंच, तसेच बीड परिसरातील रिलस्टार अशा विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेञात काम करणाऱ्या व्यक्तींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम रयत सामाजिक प्रतिष्ठान नेहमीच करत आले आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, मानाचा फेटा असे होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चित्रपट अभिनेता राजेश खर्डे, विठ्ठल मुरकेवार, सुलोचना ताई माने, गणेश माने, रयत च्या अध्यक्षा रोहिणी ताई माने, संतोष औताडे-पञकार ,लक्ष्मण लटपटे , वैभव स्वामी, ओमप्रकाश गीरी, अँड संगीताताई मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर गणेश माने सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विविध रिलस्टार व कलाकारांनी आपली कला सादर केली.