ब्रेकिंग
Trending

राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची नेवासा पोलीस स्टेशनला भेट.

संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा.                       दिनांक -10/03/2025

सविस्तर माहिती-
दिनांक 8 मार्च अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचा संवेदनशील असणारा तालुका नेवासा पोलीस स्टेशनला नुकतीच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, शेवगाव उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचेसह संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्ग हजर होता.

यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या संबंधाने केलेली तयारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची पाहणी केली.
पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन प्रलंबित गुन्हे, हरवलेली माणसे, उघडकीस न आलेले चोरीचे गुन्हे, अवैध धंद्यावरती छापे घालणे सह विविध क्षेत्रातील गुन्हेगारीचा संपूर्ण आढावा घेऊन कामासंबंधी सूचना दिल्या.
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले परंतु आणखी सुधारणा करण्याबाबत अशा व्यक्त केली.
मागील महिन्यांमध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, मनोज अहिरे, पोलीस हवालदार साठे, पोलीस कॉन्स्टेबल डमाळे, अमोल साळवे, तांबे यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले.

नंतर पोलीस अधीक्षक यांनी नवीन पोलीस स्टेशन व पोलिसांच्या निवासस्थान इमारतीची बांधकामाची पाहणी करून आर्किटेक्चर व ठेकेदार यांच्याकडून बांधकाम प्रगती बाबत माहिती घेतली.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे