भेंडा येथील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात जमिनदोस्त.व्यापारी वर्गाला अश्रू अनावर.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक -06/03/2025
भेंडा बु येथील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात काढली. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील नेवासा शेवगाव रोड वरील सर्व अतिक्रमणे आज बुधवार दिनांक 05 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वा. काढण्यास सुरुवात झाली .

बंदोबस्तात दोन्ही बाजुंनी असलेली अतिक्रमणे
काढण्याची मोहिम राबविली.
त्यांनी प्रत्येक
अतिक्रमण धारकाला
रस्त्याचे मध्यापासून १५ मीटर
अंतराच्या खुणा करून आपले अतिक्रमणे स्वतः काढुन घेण्यासाठी सुचना केल्या होत्या. यावेळी काही अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने काढुन घेतली होती. राहिलेले अतिक्रमण
प्रशासनाने काढून घेतले.

आपुली दुकाने भुईसपाट
झाल्याने डोळ्यात अश्रू दाटून आले . यावेळी काही अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने काढुन घेतली होती. .भेंडा गावची शान व बाजारपेठ आज पुर्णपणे उध्वस्त झाली.
या अतिक्रमण कारवाई मुळे हातावर पोट असलेल्या सर्व व्यापारी यांचे फार मोठे नुकसान झाले असून. त्यांच्या पुढे आपली व कुटुंबाची उपजीविका कशी करायची हे फक्त मोठे संकट निर्माण झाले आहे. यावेळी 30ते 40 वर्षांपासून असलेले आपली दुकाने उधवस्त होतांना बघतांना महिला व लहान मुलांना आपले अश्रु अनावर झाले होते. या कारवाईत सुमारे 150 ते 200 दुकाने उधवस्त झाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमण धारकांची एकच धावपळ उडाली होती.सुमारे 15 मीटर अंतरापर्यंत मोजणी करून दिली होती. याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.परतू सर्व व्यापारी यांनी सहकार्याची भूमिका घेतली व प्रशासनाला सहकार्य केले.या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी तसेच नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ससाणे साहेब कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तीन पोलिस अंमलदार ,वीस होमगार्ड यांनी दिवसभर बंदोबस्त ठेवला होता.. भेंडा गावची शान व बाजारपेठ आज पुर्णपणे उध्वस्त झाली.
या अतिक्रमण कारवाई मुळे हातावर पोट असणाऱ्या व्यापारी वर्ग व भेंडा परिसरातील जनतेच्या मनात हळहळ करणारी घटना आहे.