गुन्हेगारी

पंजाब येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी छत्रपती संभाजीनगर मध्ये (CSN)पोलिस टीम कडून जेरबंद.

संतोष औताडे-मुख्य संपादक,                             दिनांक -08/09/2024


सविस्तर माहिती –
आज सकाळी छत्रपती संभाजीनगर च्या (CSN) पोलिसांनी
एक धाडसी आणि जबरदस्त कारवाई करून संपूर्ण राज्याला
हादरवून सोडले! फीरोजपूर, पंजाब येथील तिहेरी
हत्याकांडात सामील असलेल्या सात अत्यंत धोकादायक
आरोपींना अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेत
एका तरुण महिलेची, जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर
आले होते, निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शस्त्रांनी
सुसज्ज असलेले हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पळत
होते. पण, नशिबाने या आरोपींना छत्रपती संभाजीनगर च्या
शूर पोलिस दलाच्या हातातून सुटणे अशक्य होते!
पहाटे ३:०० वाजता अचानकच मा श्री प्रविण पवार
सर, पोलीस आयुक्त यांचे मोबाइलवर पंजाब पोलिसांच्या
AGTF चे ADG श्री प्रमोद बान यांचा फोन आला. अत्यंत
गंभीर आणि तातडीची मदत हवी होती. त्यांचे शब्द थरारक
होते – त्यांच्या टीम कडे वेळ नव्हता, आणि आपलीच टीम या
मिशन साठी पुढे जाणार होती ! क्षणाचाही विलंब न करता
आमच्या दलाने सर्व तयार केले, आणि आरोपींचा मागोवा
सुरू झाला.MH26AC5599 क्रमांकाची इनोव्हा गाडी – आरोपींनी भरधाव
वेगाने पळवली! पण समृद्धी महामार्गावरून पळणाऱ्या त्या
गाडीला सकाळी ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगर
पोलिसांनी चक्रव्यूहात अडकवले! अत्यंत धाडसी योजना
आखून PI क्राईम ब्रांच श्री संदीप गुरमे आणि CIDCO चे PI
श्री गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील आमच्या १०
अधिकाऱ्यांच्या आणि ४० कर्मचाऱ्यांच्या टीमने, QRT सह
सज्ज होऊन, आरोपींना शस्त्रांनी सुसज्ज असतानाही त्यांच्या
हिशोबाने घेरले. बुलेट प्रूफ जॅकेट्स मध्ये सज्ज आमच्या
जवानांनी जणू एक रणांगणच सजवलं होतं!ऑपरेशनमध्ये निरीक्षक संदीप गुरमे यांनी अत्यंत धाडसी
योजना आखली. त्यांनी जलद प्रतिसाद पथकासह १०
अधिकारी, ४० पोलीस कर्मचारी यांना ऑपरेशनची माहिती
दिली. बुलेटप्रूफ जॅकेट, अत्याधुनिक शस्त्र घेऊन पोलीस
पथक समृद्धी महामार्गावरील कोलठाणवाडी बोगद्याच्या
दिशेने रवाना झाले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास
बोगद्याजवळ सापळा रचून थांबलेले होते. याचवेळी
आरोपी कारमध्ये एका पंपावर डिझेल भरून समृद्धी
महामार्गावरून पुन्हा मुंबईकडे निघाले. हीच संधी साधत
पोलिसांनी समोरील बोगद्यात त्यांना अपघाताचा बनाव करत
दोन्ही बाजूंनी आरोपींना घेरून ताब्यात घेतले. गोळ्या कधीही
सुटू शकल्या असत्या, पण आमचे पोलिस अत्यंत दक्ष होते!
ही कारवाई जणू एखाद्या चित्रपटा सारखी थरारक घटना वाटावी
अशीच होती – श्वास रोखून धरावा लागेल अशी ती धाडसी
मोहीम. आम्हाला मिळालेल्या माहितीने ही लढाई जिंकली,
आणि आमच्या शूर पोलिसांनी सातही आरोपींना पळ
काढण्या आधीच ताब्यात घेतलं !
आता पंजाब पोलिस आमच्याशी सातत्याने संपर्कात आहेत,
आणि आरोपींना आज संध्याकाळी त्यांच्या ताब्यात दिले
जाईल.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे