संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा दिनांक- 07/05/2024
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना शेवगाव पोलीसांनी ४८ तासाचे आत केले गजागाड
शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०२/०५/२०२४ रोजी रात्री १०/०० वा. चे सुमा. शहरटाकळी गावामध्ये
लक्ष्मीमाता देवीची छबीना मिरवणुक चालु असतांना अक्षय संजय आपसेटे वय २४ वर्षे रा. शहरटाकळी ता.शेवगाव यास
आरोपी नामे -१) अजय दावीद कोल्हे, २) किरण उत्तम चव्हाण, ३) पंकज लक्ष्मण कोल्हे, ४) अविनाश साईनाथ पवार,
५) विशाल संजय कोल्हे व त्यांचेसोबत गावातील तीन ते चार साथीदारांनी मिळुन मागील किरकोळ भांडणाच्या
कारणावरुन सुरी, सत्तुर, लोखंडी रॉड, फायटर व लाकडी काठी अशा हत्यारांनी मारहान करुन त्यास गंभीर जखमी करुन
जीवे ठार केले होते. म्हणुन मयत अक्षय संजय आपसेटे याचा भाउ संकेत संजय आपसेटे रा. शहरटाकळी यांनी वरिल
पाच जणांविरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. ३९९/२०२४ भादवि कलम ३०२, १४३, १४७,१४८,१४९,३२३
प्रमाणे दिनांक-०३/०५/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे सो यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन
वेगवेगळी तीन पोलीस पथके रवाना करुन सापळा रचुन आरोपीचा शोध घेतला असता सदर गुन्ह्यातील आरोपीत यांना
शेवगाव, नेवासा, पुणे येथुन पळुन जात असतांना पोलीस पथकाने आरोपींची ओळख पटवुन ताब्यात घेवुन नमुद
गुन्ह्याविषयी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिल्याने एका आरोपीस काही
तासातच तसेच इतर तीन आरोपीत यांना ४८ तासाचे आत अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे — १) अजय
दावीद कोल्हे वय २० वर्षे, २) किरण उत्तम चव्हाण वय २० वर्षे, ३) अविनाश साईनाथ पवार वय १९ वर्षे, ४) अनिल
रामदास मोरे वय २३ वर्षे वरिल सर्व रा. शहरटाकळी ता.शेवगाव जि. अहमदनगर यांना नमुद गुन्ह्यात अटक करण्यात
आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो. अ. नगर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत
खैरे अ.नगर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री
दिगंबर भदाणे, सपोनि अनिल बागुल, पोसई अमोल पवार, पोहेकॉ नाकाडे, पोना उमेश गायकवाड, पोना संदिप आव्हाड,
पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ धाकतोडे, पोकॉ एकनाथ गर्कळ, पोकॉ संपत खेडकर, पोकॉ संतोष वाघ यांनी केली असुन
पुढील तपास पो.नि. श्री दिंगबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल बागुल हे करत आहेत.