संतोष औताडे मुख्य संपादक ,नेवासा दिनांक 18/05/2824
सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अनोळखी
पुरुषांच्या शरीराचे तुकडे करून
मुळा कालव्याच्या पाटात
टाकल्याची घटना घडल्याने नेवासा तालुका
परिसरात खळबळ उडाली आहे.
या बाबद देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद
यशवंत ससाणे (वय-47 वर्ष) रा. देडगाव,
ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस स्टेशन हजर होऊन
फिर्याद दिली की, मी मौजे देडगाव या
गावाचा आठ वर्षा पासून पोलीस पाटील
म्हणून कार्यरत आहे. दि.16/05/2024
रोजी मी माझे घरी असताना मला माझे
देडगाव गावाचे सरपंच चंद्रकांत भानुदास
मुंगसे (वय 49 वर्ष) यांनी दुरध्वनी वरून
कळविले की, देडगावच्या हद्दीतील
पाथर्डी कडे जाणा-या मुळा धरणाच्या पाटात
एका मानवी पायाचा मासाचा तुकडा
सापडला आहे. मी प्रत्यक्ष गेल्यानंतर मला मानवी शरीराचे काही तुकडे तरंगत असल्याचे मला दिसले. त्यामुळे मी
तत्काळ कुकाणा पोलीस दुर क्षेत्राचे पोना
किरण पवार यांना कळविले, त्यानंतर काही
वेळाने नेवासा पोलीस स्टेशन सपोनी प्रमोद
वाघ साहेब व पोना किरण पवार हे घटनास्थळी
आले.
त्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास
दोन पंचासमवेत पोलीस व आम्ही सदरच्या
पाटामध्ये जावून पाहणी केली असता सदर
ठिकाणी आम्हास एक मानवी पायाचा
सडलेला मानाचा तुकडा पाण्यावर तरंगत
असल्याचे आम्हाला दिसला, त्यानंतर
आम्ही पंचासमवेत सदर पाटाच्या पूर्व
दिशेला पाहणी केली असता कुजलेले मासांचे तुकडे
मिळून आले व त्यानंतर पुढे काही अंतरावर
एका पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये अनोळखी
मानवी कुजलेले पुरुष जातीचे मुंडके आढळून आले. कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी काळिमा फासणारे कृत्य करून पुरावा नष्ट करण्याचे काम केले आहे. सदर घटनेची माहिती घेऊन नेवासा पोलिस स्टेशन मध्ये भादवी कलम 302,201 नुसता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी देडगाव येथील गावालगत असणारा पाथर्डी कॅनॉल मध्ये माणसाच्या मृतदेहाचे ५ ते ६ तुकडे आढळले असून परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. ही माहिती कळताच नेवासा कुकाना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वाघ साहेब पोलीस नाईक किरण पवार व संतोष खंडागळे, बबलू चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असून पाहणी केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह २० ते २५ दिवसाचा असावा. त्यामुळे मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. नेमका कुणाचा आहे याचे तपासणी करणार आहेत. मृतदेहाचे मिळालेले तुकडे उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात येणार असून त्यानंतरच तपासाला सोपे जाईल. मृतदेहाचे पाय, मुंडके, मांडी असे अवशेष सापडले आहे . या गंभीर घटनेमुळे देडगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण येत्या सहा महिन्यात कॅनॉल मध्ये तिसरी घटना आहे. हि हत्या की घातपात काय असावे ही परिसरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलकुमेऀ साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटीलसाहेब, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब.यांनी घटनास्थळी धाव घेतली.. यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब हे करीत आहे.