जिजामाता महाविद्यालयात रांगोळी प्रदर्शन व ब्युटी पार्लर कोर्स चे उद्घाटन उत्साहात संपन्न.
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -20/03/2024
सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयात रांगोळी प्रदर्शन व ब्युटी पार्लर कोर्स चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
भेंडे येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले होते.विद्यार्थिनींसाठी ब्युटी पार्लर कोर्सचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते डॉ. क्षितिज नरेंद्रजी घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नियोजन प्रा. डॉ. अनुराधा बोठे, प्रा. मीना पोकळे, प्रा. मनीषा कातोरे, प्रा. कोमल शिंदे, प्रा. ऋतुजा बोरा, प्रा. अर्चना मडके, प्रा. प्रिया निंबाळकर, प्रा. तेजल सोनवणे यांनी केले.
क्षितिज भैया यांनी रांगोळी मध्ये सहभागी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले आणि ब्युटीपार्लर कोर्ससाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे पाटील, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, विश्वस्त प्रा. डॉ. नारायण म्हस्के, अशोकदादा मिसाळ, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. काकासाहेब लांडे, सहकार्याध्यक्ष प्रा. पांडुरंग देशमुख, सहकार्याध्यक्ष कुंदन बडधे, सहकार्याध्यक्ष श्री. बंडू घोडेचोर, प्रा. डॉ. संभाजी तनपुरे, प्रा. महेंद्र तांबे, मते सर, प्रा. सरिता नवथर, प्रा. ईश्वरी वाबळे, ब्युटीपार्लर प्रशिक्षिका सौ. सुनिता गुंजाळ आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.