जेष्ठ उधोगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श उधोगरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

संतोष औताडे-मुख्य संपादक दिनांक- 19/08/2023
सविस्तर माहिती -महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या उद्योजकांना राज्य शासनाच्या वतीने या वर्षीपासून ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमधील ‘उद्योगरत्न’ हा मानाचा पहिला पुरस्कार आज ज्येष्ठ उद्योगपती रतनजी टाटा यांना राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या उद्योजकांना राज्य शासनाच्या वतीने या वर्षीपासून ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमधील ‘उद्योगरत्न’ हा मानाचा पहिला पुरस्कार आज ज्येष्ठ उद्योगपती रतनजी टाटा यांना राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र सरकारचा ‘#उद्योगरत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल आदरणीय श्री. रतन टाटा यांचे त्रिवार अभिनंदन. हा पुरस्कार स्वीकारण्यास सहमती दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. भारतीयांसाठी टाटा म्हणजे अढळ विश्वास! टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे गुणवत्तेची खात्री. टाटांची नाममुद्रा ही भारतीयांच्या भावविश्वाचा एक भाग आहे. हा विश्वास टाटांनी अथक प्रयत्नातून मिळवलेला आहे आणि अविरत सांभाळलेलाही आहे. केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या प्रांतातही टाटा यांचे काम अतिशय मोलाचे आहे. त्यांनी टाटा औद्योगिक समुहाचा विस्तार करण्यासोबतच समाजाला मानवतेचेही दर्शन घडवले. संशोधनापासून ते विविध कलांचे जतन करण्यापर्यंत सर्वच बाबतीत त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. मिठाच्या उत्पादनापासून ते चांद्रयान-३ ला अवकाशात पोहोचवणाऱ्या रॉकेट लॉन्चसाठी ज्या क्रेनचा वापर करण्यात आला होता, ती क्रेन टाटा स्टीलच्या फॅक्ट्रीत बनवण्यात आली होती, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. श्री रतन टाटा यांना पुरस्कार प्रदान करण्यातून एक प्रकारे महाराष्ट्र सरकारचाच गौरव झाला आहे.
तसेच उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना, उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.