यवतमाळ जिल्ह्यातील दुहेरी खुनाचे गुन्ह्यातील 6 फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.
संतोष औताडे – मुख्य संपादक, नेवासा दिनांक :- 20/07/2023
———————————————–
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन वरील प्रमाणे दाखल खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेवुन आवश्यक कारवाई करणे बाबत आदेश दिले. पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, शरद बुधवंत, पोना/ रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, फुरकान शेख, विशाल गवांदे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन अहमदनगर ते छत्रपती संभाजी नगर रोडने जावुन सापळा लावुन आरोपींना ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदश केले.
पथकाने दिनांक 20/07/23 रोजी 13.00 वा. चे सुमारास अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडने, वांबोरी फाटा येथे जावुन सापळा लावुन थाबंलेले असताना थोडाच वेळात एक महिंद्रा कंपनीचा मालवाहु टेम्पो येताना दिसला. पथकाची खात्री होताच टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा करताच त्याने टेम्पो रस्त्याचे कडेला घेतला. टेम्पोतील इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) पवन बाजीराव वाळके वय 23, 2) निलेश दिपक थोरात वय 24, 3) गोपाल शंकर कापसे, वय 26, 4) गणेश संतोष तोरकड, वय 21, 5) गणेश शंकर कापसे, वय 24, 6) अवि अंकुश चव्हाण, वय 22, सर्व रा. विटाळवार्ड, ता. पुसद, जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितले. नमुद संशयीताकडे विचारपुस करता त्यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा केल्याचे कबुल झाल्याने त्यांना महिंद्रा कंपनीचे मालवाहु टेम्पोसह ताब्यात घेवुन पुसद शहर पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पुसद शहरपोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ करीत आहे.
आरोपी नामे पवन वाळके जिल्हा यवतमाळ हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द यवतमाळ जिल्ह्यात जबरी चोरी व गंभीर दुखापत करणे व इतर कलमान्वये एकुण 7 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 746/18 भादविक 324, 504, 506, 34
2. वसंतनगर पुसद, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 48/19 भादविक 392, 34
3. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 334/19 मपोकाक 122
4. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 405/21 भादविक 394
5. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 414/21 भादविक 324, 506, 34
6. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 300/22 भादविक 324, 323, 504, 506, 34
7. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 495/22 भादविक 324, 323, 34
आरोपी नामे निलेश थोरात जिल्हा यवतमाळ हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द यवतमाळ जिल्ह्यात जबरी चोरी व गंभीर दुखापत करणे असे एकुण 3 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 746/18 भादविक 324, 504, 506, 34
2. वसंतनगर पुसद, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 48/19 भादविक 392, 34
3. वसंतनगर पुसद, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 46/19 भादविक 392, 34
आरोपी नामे गोपाल कपासे जिल्हा यवतमाळ हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द यवतमाळ जिल्ह्यात जबरी चोरी व गंभीर दुखापत करणे असे एकुण 3 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 70/17 भादविक 457, 380, 201, 34
2. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 405/21 भादविक 394
3. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 414/21 भादविक 324, 506, 34
4. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 300/22 भादविक 324, 323, 504, 506, 34
5. पुसद शहर, जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 495/22 भादविक 324, 323, 34
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.