ब्रेकिंग
Trending

दोन खुन करणारा सराईत आरोपी नेवासा पोलिसांनी केला जेरबंद.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -20/07/2023

दिनांक 16.07.2023 रोजी दुपारी 04.25 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन मेढा ता. जावळी जि. सातारा येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील मोजे एकीव ता. जावळी येथील धबधब्याजवळ अनोळखी दोन इसमांनी ईसम नामे 01) अक्षय शामराव अंबवले रा.बसाप्पाची वाडी, 02) गणेश अंकुश फडतरे रा. करंजे ता. जि. सातारा या दोन्ही इसमांना लाथा बुक्क्यांनी मारहान करुन धबधब्याचे दरीत ढकलून देवून त्यांचा खुन केला म्हणून पोलीस स्टेशन मेढा ता. जि. सातारा येथे गु.र.नं 114/2023 भा.दं.वि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वर नमुद गुन्ह्यातील आरोपीतांची सातारा पोलीसांनी माहिती घेवुन त्याबाबत तपास करून सदरच्या गुन्ह्यातील आरोपीत नामे साहील मेहबुब शेख रा. भिमाबाई आंबेडकर नगर सदर बाजार सातारा ता. जि. सातारा हा MH 500736 या क्रमांकाच्या मालवाहतुक ट्रकमध्ये बसुन साताऱ्याकडुन जालन्याकडे जात आहे अशी माहिती सातारा पोलीसांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजीराव डोईफोडे यांना माहिती दिली त्यावरुन पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी पोलीस स्टेशन नेवासा येथील डी.बी पथकाचे अंमलदार मपोना/ सविता उंदरे, पोकों/शाम गुंजाळ, सुमित करंजकर व ट्राफीक अंमलदार पोना/किरण गायकवाड असे अंमलदारांचे पथक तयार करुन सदरचे पथक खडका फाटा येथे रवाना केले सदर पथकाने खड़का फाटा येथे नाकाबंदी करुन मालवाहतुक करणारे ट्रकची चेकींग सुरू केली असता, त्यादरम्याण MH 500736 अशा क्रमांकाचा ट्रक आला असता, सदरचा ट्रक थांबवुन त्यामधील ईसमांना चेक करुन त्यामधील ड्रायव्हर व क्लिनर यांची विचारपुस केली त्यामधील ड्रायव्हर याने त्याचे नाव साहील मेहबुब शेख, वय 19 वर्षे, रा. भिमाबाई आंबेडकर नगर सदर बाजार सातारा ता.जि. सातारा असे सांगितले त्यावरुन तोच आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास नेवासा पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना कळवून त्यास पोलीस स्टेशन नेवासा येथे आणुन कायदेशीर कारवाई पुर्ण करुन सातरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.·

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो अहमदनगर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर श्रीरामपुर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे अहमदनगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शिवाजी डोईफोडे पोलीस निरीक्षक, पोना किरण गायकवाड, मपोना/सविता उंदरे, पोकों/शाम गुंजाळ पोकों / सुमित करंजकर यांनी केलेली आहे.

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे