गुन्हेगारी
Trending

खडका फाटा, ता. नेवासा येथे दरोड्याचे तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी 2,18,500/- रुपये किंमतीच्या साधनासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

 संतोष औताडे – मुख्य संपादक दिनांक :- 19/07/2023 

———————————-

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते.

नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/ दत्तात्रय गव्हाणे, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/रोहित मिसाळ, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या होत्या.

नमुद सुचना प्रमाणे पथक नेवासा परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, खडकाफाटा, ता. नेवासा येथील सिमेंट पोल फॅक्टरी जवळ काही इसम मोटार सायकलीसह कोठेतरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत रस्त्याचे कडेला अंधारात बसलेले आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने लागलीच नेवासा पोलीस स्टेशनचे पोकॉ/शाम गुंजाळ व पंचाना सोबत घेवुन नमुद ठिकाणी जावुन वाहन रस्त्याचे कडेला लावुन पायी चालत बॅटरीचे उजेडात खात्री केली असता काही इसम अंधारात दबा धरुन बसलेले दिसले पोलीस पथकाची चाहुल लागताच सदर संशयीत इसम पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन चार (04) इसमांना ताब्यात घेतले व दोन (02) संशयीत इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) किरण बाळु काळे, वय 19, रा.बाळापुर बोलेगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर, 2) रामेश्वर जंगल्या भोसले, वय 26, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जिल्हा बीड, 3) अभिक ऊर्फ महाडीक बंड्या भोसले वय 21, रा. बोलेगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 4) स्वरुप ऊर्फ गुंड्या डिचार्ज काळे वय 24, रा. अंतापुर, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमाचे नाव 5) अरुण काळे (फरार) व 6) तीनताश्या खंडु काळे दोन्ही रा. बोलेगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर (फरार) असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत एक तलवार, एक एअरगन व लाकडी दांडके मिळुन आल्याने हत्याराबाबत त्यांचेकडे अधिक विचारपुस करता संशयीत इसम नेवासा परिसरात शेतवस्तीवर जावुन कोठेतरी दारोडा घालण्याचे तयारी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. 

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास करुन त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे व किती ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अगर चोरीचे गुन्हे केली आहे. याबाबत विचारणा करता त्यांनी नेवासा परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.

1. नेवासा गु.र.नं.420/23 भादविक 454, 380

2. नेवासा गु.र.नं.683/23 भादविक 454, 380

3. नेवासा गु.र.नं.764/23 भादविक 454, 380, 34

ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातुन 500/- रुपये किंमतीची एक तलवार व लाकडी दांडके, 1,500/- एक एअरगन, 16,500/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे तीन मोबाईल फोन व 2,00,000/- रुपये किंमतीच्या चार शाईन मोटार सायकल असा एकुण 2,18,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवुन आरोपी विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं.769/2023 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे इतर पळुन गेलेल्या साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही.

 

आरोपी नामे स्वरुप ऊर्फ गुंड्या काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, दरोडा तयारी व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण -10 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. वाळुंज, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 49/2020 भादविक 395

2. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 434/20 भादविक  399, 398, 402 आर्म 4/25

3. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर 441/2020 भादविक 395, 397

4. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर 429/2020 भादविक 395, 397, 337, 511

5. वाळुंज, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 43/2020 भादविक 395

6. वाळुंज, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 88/2020 भादविक 395

7. खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 295/2022 भादविक 395, 397

8. नगर तालुका 462/2022 भादविक 454, 380

9. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर 829/2022 भादविक 454, 380

10. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर 862/2022 भादविक 454, 380

 

आरोपी नामे रामेश्वर जंगल्या भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, दरोडा तयारी, घरफोडी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण -10 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 81/2017 भादवि क 394, 511, 34

2. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 425/2017 भादविक  399, 402

3. राहुरी, जिल्हा अहमदनगर 692/2018 भादविक 457, 380, 511

4. गंगापुर,  जिल्हा छत्रपती संभाजीनगर 434/2020 भादविक  399, 398, 402 आर्म 4/25

5. कर्जत, जिल्हा अहमदनगर 474/2021 भादविक 307, 454, 455, 459, 397

6. कर्जत, जिल्हा अहमदनगर 360/2021 भादविक 380

7. सिलेगांव,  जिल्हा छत्रपती संभाजीनगर 347/2022 भादविक 454, 380, 34

8. नगर तालुका, जिल्हा अहमदनगर 462/2022 भादविक 454, 380 (फरार)

9. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर 829/2022 भादविक 454, 380 (फरार)

10. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर 862/2022 भादविक 454, 380 (फरार)

 

आरोपी नामे अभिक ऊर्फ महाडीक भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द छत्रपती संभाजीनगर येथे   दरोडा तयारी असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे तो खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर 434/20 भादविक 399, 398, 402 आर्म 4/25

 

सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे