अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेणारा व आरोपीस मदत करणारा असे एकुण दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

संतोष औताडे -मुख्य संपादक,नेवासा दिनांक :-१५/०६ /२०२३
दुरगांव, ता. कर्जत येथील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेणारा
व आरोपीस मदत करणारा असे एकुण दोन आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.·
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक २३/०५/२०२३ रोजी म्हसोबा वस्ती, दुरगांव, ता. कर्जत
येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने फुस लावुन अज्ञात कारणासाठी पळवून नेले होते. सदर घटने
बाबत फिर्यादी यांनी कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०० / २०२३ भादविक ३६३, ३६६ (अ), २१२
बा.लै.अ.सं.अ.क. १२ सह अ.जा.ज.अ.प्र.का.क. ३ (२) (व्ही), ३ (२) (व्हीए) प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा
दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी
घटना ठिकाणास समक्ष भेट देवून पोनि / श्री दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक
गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन फरार
आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/ श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / गणेश वारुळे, हेमंत
थोरात, पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/ बबन मखरे, पोहेकॉ / सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, देवेंद्र शेलार, पोना/
रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ/ रोहित मिसाळ, सागर ससाणे, रोहित
येमुल, रणजीत जाधव, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे,
प्रशांत राठोड, राहुल गुंडू व मपोना / भाग्यश्री भिटे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन वेगवेगळी
पथके नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पथक आरोपी व
पिडीतेची माहिती घेत असताना ते पनवेल, रायगड, कोल्हापुर व पुणे येथील त्यांचे नातेवाईक किंवा मित्रांकडे
जाण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपास करताना आरोपी हा पिडीतेस घेवुन अजमेर, राज्यस्थान येथे
गेला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने अजमेर राजस्थान येथे जावुन बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पिडीत आरोपी व त्याचा साथीदार सीसीटीव्ही फुटेलमध्ये
दिसुन आल्याने परिसरातील ७०० ते ७५० हॉटेल व लॉजेस चेक केले व परिसरातील खादीम, एजन्ट
यांचेशी संपर्क करुन माहिती घेतली. तसेच अजमेर परिसरातील स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुप व सोशल
मिडीयाच्या मदतीने आरोपीचे फोटो प्रसिध्द करुन त्या आधारे तपास सुरु केला. परंतु आरोपीस पोलीस
आपला शोध घेत असल्याची माहिती मिळाल्याने वारंवार जागा बदलुन राहत होते. दरम्यान स्थानिक
व्हॉट्सअॅप ग्रुपवरील माहितीचे आधारे बातमीदाराने आरोपी हे अजमेर येथुन जयपुर येथे गेल्याची माहिती
दिली. पथकाने जयपुर येथे जावुन तपास करता आरोपी हे जयपुर येथुन सवाईमाधवपुरा येथे गेल्याचे
सीसीटीव्ही फुटेज वरुन दिसुन आले.नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) अजीम खलील शेख
वय २१, रा. थोटेवाडी, दुरगांव, ता. कर्जत व एक अल्पवयीन पिडीत मुलगी असे असल्याचे सांगितल्याने
त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीस कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास
उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग, कर्जत हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे अजीम खलील शेख यास मदत करणारा त्याचा साथीदार
नामे २) मनोज बापु कटारे वय २३, मुळ रा. लोणीमसदपुर, ता. कर्जत हल्ली रा. गौतमनगर, पवई
झोपडपट्टी, मुंबई ३) सईद शहाबुद्दीन शेख, वय २४, रा. स्वामी चिंचोली, शेखवस्ती, ता. दौंड, जिल्हा पुणे,
३) गोकुळ महादेव भांगे, वय ३३, मुळ रा. थोटेवाडी, दुरगांव, ता. कर्जत हल्ली रा. पाटस, ता. दौंड, जिल्हा
पुणे व ४) परवीन शेखलाल मुलानी वय ३७, मुळ रा. भिगवन, ता. इंदापुर, जिल्हा पुणे हल्ली रा. राजेगांव,
ता. दौंड, जिल्हा पुणे यांना आरोपी केलेले आहे. सदर गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करण्यात येवुन
आरोपीस पळुन जाण्यास कोणी कोणी मदत केली अशा सर्व नातेवाईक व मित्रांना आरोपी करण्यात
येणार आहे. यापुढे अल्पवयीन मुलींना पळुन जाणेकामी कोणीही सहकार्य केल्यास त्यांना सह आरोपी
केले जाईल असे अवाहन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी केले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे
साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय ·पोलीस
अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी केलेली आहे.