आमदार श्री. राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जिवे ठार मारण्याची धमकी देणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

संतोष औताडे- मुख्य संपादक, दिनांक-12/06/2023
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ३०/०५/२०२३ रोजी श्री. अमित अरुण चिंतामणी है। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे चोंडी, ता. जामखेड येथे पुण्यतिथी कार्यक्रमाचे तयारी करीत असताना त्याचे मोबाईलवर सागर गवासणे याने मोबाईलवर फोन करुन तुम्ही राम शिंदे साहेबांचे जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाहीतर पाहुन घेईन अशी व फेसबुक लाईव्ह करुन आमदार राम शिंदे साहेब व अपरिचीत व्यक्तीचे नाव घेऊन घरात घुसून मारीन अशी धमकी देऊन दोन राजकीय पक्षाचे लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन जामखेड पोलीस स्टेशन अदखलपात्र गु.र.नं. २३३ / २०२३ भादविक ५०४, ५०५ (२), ५०६ (२) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन घटनेचा समांतर तपास करुन आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, राम माळी, रविंद्र कर्डिले, पोना/सचिन अडबल, प्रशांत राठोड,राहुल गुड्डू ,मेघराज कोल्हे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन आरोपीचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या..
स्थागुशा विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार मध्यप्रदेश येथे उज्जैन व इंदौर परिसरात फिरून आरोपीची माहिती घेत असतांना धमकी देणारा इसम उज्जैन परिसरात मिळून आल्याने त्यास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने सागर सुभाष गवासणे, वय ३४, रा. पिंपळगाव उंडा, ता.जामखेड जि. अहमदनगर हल्ली रा. वाकड,जि.पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास घटनेच्या पुढील तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर केले आहे.
धमकी देणारा इसम नामे सागर सुभाष गवासणे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व बाहेर जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचा एकूण १० गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
पोलीस स्टेशन जामखेड
गु.र.नं. कलम
२७/२००८ भाविक ३२४, ३२३, ५०४, ५०६.
जामखेड १०२/२०१४ भाविक ३०२,१२० ब), १४३, १४७ आर्म अॅक्ट ३/२५.४/२५ जामखेड २१०/२०११ भाविक ३०७, ३८६, ५०४, ५०
६.जामखेड
२५३/२०१९ भाविक २९५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३ जामखेड ३०५/२०१९ आर्म अॅक्ट ३/२५
जामखेड ४७८/२०१९ भादयिक ३०७, ३८५, ३४१ आर्म अॅक्ट ३२५
जामखेड ८१/२०२० भाविक ३०७, ३२३, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ३/२५
शिवाजीनगर जि.बीड ३३/२००९ आर्म अॅक्ट ३/२५
उस्मानाबाद ग्रामीण ११८/२०१० भाविक ३९५
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उविपोअ, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.