महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखु बेकायदेशिररित्या वाहतुक करणारे सराईत आरोपी जेरबंद.१७,३५,२००/- रु. किं. मुद्देमाल जप्त

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक :- ३०/०५/२०२३
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि / श्री. दिनेश आहेर,
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कायदेशीर
कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना / सचिन आडबल,
पोकॉ/शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे व पोकॉ/ अमृत आढाव अशांना बोलावुन घेवुन फरार
व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक
फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पोनि / श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती
मिळाली की, इसम नामे अल्ताफ पठाण, रा. नाईकवाडापुरा, ता. नेवासा हा त्याचे मुलांचे मार्फत पांढरे
रंगाची हुंडाई क्रेटा गाडीमधुन शेवगांव ते नेवासा रोडने गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखुची बेकायदेशिर
वाहतुक करीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/दिनेश आहेर यांनी
प्राप्त माहिती पथकास कळवुन शेवगांव पोलीस स्टेशनचे अंमलदार व पंचाना सोबत घेवुन बातमीतील नमुद
ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पथकाने शेवगांव पोलीस स्टेशनचे अंमलदार व पंचांना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी
दिशा अॅग्रो इंडस्ट्रीज, भायगाव, ता. शेवगांव येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना शेवगांवकडुन
येणारे रोडने एक पांढरे रंगाची कार येताना दिसली. पथकाची व पंचाची खात्री होताच कार चालकास
बॅटरीचे सहाय्याने थांबण्याचा इशारा करताच चालकाने वाहन थांबविले. त्यावेळी कारमध्ये तीन इसम
बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन वाहनाची पाहणी करता पांढरे रंगाचे हुंडाई क्रेटा
गाडीमध्ये गोण्या ठेवलेल्या दिसल्या. सदर गोण्यांची पंचा समक्ष पाहणी करता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात
प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखु असल्याची खात्री झाल्याने गाडीतील सर्व इसमांना
ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मोजीम
अल्ताफ पठाण, वय ३३, २) अजीम अल्ताफ पठाण वय ३०, ३) परवेझ असीफ पठाण, वय २७, सर्व
रा. नाईकवाडापुरा, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गाडीतील गुटखा, पानमसाला व
तंबाखु बाबत विचारपुस करता अ.क्र. व २ यांनी माझे वडील ४) अल्ताफ इमामखान पठाण रा.
नाईकवाडापुरा, ता. नेवासा ( फरार ) यांचे सांगणेवरुन इसम नामे ५ ) नाना ऊर्फ आदिनाथ जाधव रा.
पांढरवाडी, ता. गेवराई, जिल्हा बीड (फरार) याचेकडुन विक्री करीता आणल्याची कबुली दिली.वर नमुद तीन आरोपींचे ताब्यातुन १,९२,०००/- रु. किंमतीचा हिरा गुटखा, विविध प्रकारचा
पानमसाला, ४३,२००/- रु. किंमतीची रॉयल तंबाखु व १५,००,०००/- रु. किंमतीची पांढरे रंगाची
हुंडाई क्रेटा कार असा एकुण १७,३५,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशिररित्या कब्जात
बाळगुन वाहतुक करताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द शेवगांव पोलीस स्टेशन येथे पोकॉ/ शिवाजी
अशोक ढाकणे ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे तक्रारी वरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं.
४४५ / २०२३ भादविक ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन
पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे फरार साथीदारांचा त्यांचे राहते घरी जावुन
शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.
आरोपी नामे अजीम अल्ताफ पठाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व संभाजीनगर जिल्ह्यात
गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा व पोक्सो कायद्यान्वये एकुण – ०३ गुन्हे दाखल आहेत
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे
साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस
अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी केलेली आहे.